Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»62 ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!
    ताज्या बातम्या

    62 ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 1, 2026No Comments151 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव पोलिसांची कारवाई : जिल्ह्याला अमली पदार्थांचा विळखा

    जळगाव – अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एमडी या घातक अमली पदार्थाची तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवाईत 62.07 ग्रॅम एमडीसह एकूण 3 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या मालेगावच्या एका संशयिताचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2026 रोजी रात्री 10.40 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ (एफसीआय गोडाऊन), सेक्टर क्र. A-14 समोरील रस्त्यावर पोलीस पथक गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेला एमडी हा अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आणि मुद्देमाल जप्त केला. दरम्यान या कारवाईत पोलिसांनी इम्रान खान हयात खान (वय 36, मूळ रा. आडगाव, सध्या रा. करीम नगर, फातिमा नगर, जळगाव) याला अटक केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, हा अमली पदार्थ त्याला रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने विक्रीसाठी उपलब्ध करून दिला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी रफीक विरुद्धही गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाई एमडी ड्रग्ज 39.06 ग्रॅम 1 लाख 96हजार, 11 प्लास्टिक पिशव्यांमधील 9.10 ग्रॅम एमडी 36 हजार आणि 18 प्लास्टिक पिशव्यांमधील 13.91 ग्रॅम एमडी 56 हजार अशा प्रकारे एकूण 62.07 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला असून त्याची बाजारपेठीय किंमत सुमारे 2 लाख 88 हजार रुपये आहे. तर 20 हजार रुपये किमतीचा एक रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन आणि 50 हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण 3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करत आहेत.

    नागरिकांना पोलिसांचे आवाहन
    अमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला वाचवण्यासाठी जळगाव पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांची करडी नजर असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहील. नागरिकांनाही आपल्या परिसरात अमली पदार्थांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा. समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif