Sunday, January 29, 2023

हिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण ?

- Advertisement -

 

हिमाचल प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क:

गुजरात विधान सभा (Gujarat Legislative Assembly) निवडणुकीत तोंडघशी पडलेल्या कॉंग्रेससाठी (Congress) हिमाचल प्रदेशातून मात्र आनंदवार्ता आहे. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) यावेळी कॉंग्रेसनं करिश्मा केला आहे. कारण हिमाचलमध्ये आता कॉंग्रेसचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित आहे. अशात हिमाचल प्रदेशातल्या अनेक कॉंग्रेस दिग्गजांनी मुख्यमंत्री पदासाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कॉंग्रेस हायकामांडच्या मनात कोण आहे याबाबत उत्सुकता लागली आहे.

- Advertisement -

कॉंग्रेस हायकमांड हिमाचल प्रदेशमधील नेते विक्रमादित्य सिंग, प्रतिभा सिंग, सुखविंदर सिंग सुखू आणि मुकेश अग्निहोत्री यांच्यापैकी पक्ष कोणाला मुख्यमंत्री बनवणार? याबाबत अजूनही भूमिका स्पष्ट झालेली नाही.

अग्निहोत्री हे वीरभद्र सिंह यांच्या जवळचे मानले जात होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह देखील मुकेश अग्निहोत्री यांच्या नावाला पाठिंबा देऊ शकतात. मात्र, निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेस हायकमांड ज्या प्रकारे हैराण झाले होते, ते पाहता पक्ष कोणता अनपेक्षित निर्णय घेऊ शकतो. अशा परिस्थितीत सध्या एक-दोन दिवसांत काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या दिग्गज नेत्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेलेच राहणार आहेत.

हिमाचल प्रदेश राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमचाता आकडा हा 35 आहे. काँग्रेसने जादूई आकडा पार केला आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. मात्र मुख्यमंत्रीपदाचा दावा मांडणारे अनेक उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे पक्षातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आता कमी झाले आहेत. पण काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे.

मात्र यादरम्यान operation lotus च्या भीती पोटी सर्व जिंकलेल्या आमदारांना तत्काळ हलवण्यात येणार असल्याचेही वृत्त आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे