काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस नेत्यांसोबत बैठका सुरु होत्या. सातत्यानं सुरु असलेल्या बैठकांचं सत्र सोनिया गांधी यांचं काँग्रेस नेत्यांसोबत सुरु होतं. दरम्यान, आता सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यां समोर आल्यानं संपर्कात आलेल्या इतरही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केला जातोय. काँग्रेस प्रवक्तेत रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. बुधवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांना ताप आला होता. तापाची हलकी लक्षणं समोर आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याच स्पष्ट झालंय.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचं समन्स
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या दोघांनाही 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीनं सांगितलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसनं हे सूडाचं राजकारण असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आम्ही ईडीच्या नोटीशीला घाबरणार नसल्याचंही रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं. आम्ही या नोटीशीला घाबरणार नाही आणि केंद्र सरकारसमोर झुकणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.