Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»सुनेत्रा पवारांवर ‘गुंगी गुडिया’चा काँग्रेसतर्फे हल्लाबोल!
    संपादकीय

    सुनेत्रा पवारांवर ‘गुंगी गुडिया’चा काँग्रेसतर्फे हल्लाबोल!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 6, 2026Updated:August 6, 2026No Comments177 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    एकेकाळी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर विरोधकांच्या वतीने ‘गुंगी गुडिया’ म्हणून हल्लाबोल केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांच्यावर विरोधकांनी हा हल्ला चढवला होता. त्यात ‘गुंगी गुडिया’ म्हणून त्यांची टीका करण्यात आली होती. इंदिरा गांधी संसदेत बोलत नव्हत्या. त्यानंतर त्या मोठ्या प्रमाणात बोलायला लागल्या. त्या इतक्या बोलू लागल्या की विरोधकांना पळता भुई थोडी झाली. एका दृष्टीने इंदिरा गांधींवर ‘गुंगी गुडिया’चा हल्लाबोल झाला, ते एक दृष्टीने चांगलेच झाले, असे म्हणता येईल.

    त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सुद्धा असा बदल होण्याची दाट शक्यता आहे. सध्या सुनेत्रा पवार या कसल्याच चर्चेत भाग घेत नाहीत किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपले मत व्यक्त करण्यास त्या पुढे धजावत नाहीत. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या संदर्भात चौकशी करा अथवा चौकशी झाली पाहिजे, याबाबत त्या काहीही बोलत नाहीत. इतकेच नव्हे तर विधानसभेत सुद्धा एखादा प्रश्न आला तर त्या प्रश्नावर आपले काहीही मतप्रदर्शन करत नाहीत. एकंदरीत काय, तर चिडीचूप राहणे त्या पसंत करतात. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हणून संबोधले. त्याला काँग्रेसच्या वतीने दुजोरा देण्यात आला. विशेषतः अनेकांनी त्याला मोठ्या प्रमाणात पुष्टी जोडली आणि काँग्रेसतर्फे एकच ‘गुंगी गुडिया’चा मारा सर्वत्र सुरू झाला.

    परंतु सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हटलेले पक्षाला आवडले नाही. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत काँग्रेसवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि एका महिलेबाबत असे वक्तव्य करणे अशोभनीय आहे, असे म्हटले. तर त्यांच्याच पक्षातील इतर अनेक जण म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ हे स्वतःला विरोधी पक्षनेते समजतात. तसे समजून अशा प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन टीका-टिप्पणी करणे त्यांना शोभत नाही. म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. परंतु ‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग केल्याने काय बिघडले, हे कळत नाही. जे आहे त्याचा स्वीकार करायला काय हरकत आहे? यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनीदेखील त्याला दुजोरा दिला असून त्यांनी म्हटले आहे की, ‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग त्या वेळच्या विरोधी पक्षांनी इंदिरा गांधी यांच्या बाबतीत वापरला होता. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत काँग्रेसने वापरलेला ‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, असे म्हणता येत नाही. किंवा ‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग केल्याने सुनेत्रा वहिनींचे चारित्र्यहनन झाले, असेदेखील म्हणता येणार नाही.

    सुनेत्रा पवार यांनी अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राजकारण करायला सहा महिने सुद्धा झाले नाहीत. दरम्यान, त्या सर्व प्रकारचा अभ्यास करत असतील. त्यामुळे त्या कमी बोलत असतील. याचा अर्थ त्या बोलणारच नाहीत, असे होणार नाही. त्यामुळे त्याबाबत एवढा अखंड ऊहापोह करण्याची गरज नाही. विशेषतः काँग्रेसने सुद्धा फार मोठा तोरा मारण्यासारखे करण्याची काही गरज नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026

    जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!

    September 13, 2026

    एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif