काँग्रेसची कारवाई, 16 बंडखोरांची हकालपट्टी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडवला जात आहे. दरम्यान, विविध पक्षांच्या नेत्यांकडून बंडखोरीही केली जात आहे. काँग्रेसने 16 बंडखोर उमेदवारांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही सूचना दिली. या सूचनेवरून पक्षाने बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. या उमेदवारांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

यामध्ये रामटेक मतदारसंघातील राजेंद्र मुळक, काटोल येथील काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, कसबा मतदार संघाचे कमल व्यवहार यांच्यासोबत 16 जणांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. याआधीच काँग्रेसने बंडखोरांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे भाजपकडूनी 37 विधानसभा मतदारसंघाती 40 बंडखोर नेते तसेच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली.

निलंबित केलेल्या बंडखोरीची यादी

आरमोरी- आनंदराव गेडाम, शिलू चिमूरकर

गडचिरोली – सोनल कोवे, भरत येरमे

बल्लारपूर – अभिलाषा गावतूरे, राजू झोडे

भंडारा -प्रेमसागर गणवीर

अर्जुनी मोरगाव – अजय लांजेवार

भिवंडी – विलास रघुनाथ पाटील, आसमा जव्वाद चिखलेकर

मीरा भाईंदर – हंसकुमार पांडे

कसबा पेठ – कमल व्यवहारे

पलूस कडेगाव – मोहनराव दांडेकर

अहमदनगर शहर – मंगल विलास भुजबळ

कोपरी पाचपाखाडी – मनोज शिंदे, सुरेश पाटीलखेडे

उमरखेड – विजय खडसे

यवतमाळ – शबबीर खान

राजापूर – अविनाश लाड

काटोल – याज्ञवल्क्य जिचकार

रामटेक – राजेंद्र मुळक

Leave A Reply

Your email address will not be published.