यावल तालुक्यात उद्यापासून ‘हात से हात जोड़ो’ अभियान

0

लोकशाही न्युज नेटवर्क
येथील यावल तालुका व शहर कॉग्रेस कमिटीचे “हात से हात जोड़ो” अभियानास सुरुवात होत असुन या अभियानास यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कॉंग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे .

यावल तालुक्यात २३ जानेवारी सोमवार पासुन सकाळी १०:३० वाजता यावल शेतकी संघ येथे “हात से हात जोड़ो” अभियान शुरु होण्याचे अगोदर पक्षचे ध्वजारोहण काँग्रेस कमेटीचे प्रदेश उपाध्यक्ष रावेर -यावल मतदार संघाचे आ. शिरीष चौधरी यांचेहस्ते आणि प्रभाकर सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली अभियानाची सुरवात होणार आहे. हात से हात जोडो अभियानामध्ये माजी आ. रमेश चौधरी, हाजी शब्बीर खान, भगतसिंग पाटील,आर. जि.पाटील, नितीन चौधरी, लीलाधर चौधरी,शेखर पाटील, मारूळचे जावेद जनाब, धनंजय चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच नगरसेवक,शहर कॉग्रेस पदाधिकारी, तालुका कॉग्रेस पदाधिकारी, अल्पसंख्याक कॉग्रेस पदाधिकारी, एस. सी. विभाग पदाधिकारी, महिला कॉग्रेस पदाधिकारी, सेवा दल पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी यांनी उपस्थित राहून हात से हात जोडो अभियानामध्ये उपस्थित रहावे असे आवाहन यावल शहर कॉंग्रेस कमिटीचे कदीर खान व फैजपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रियाज शेख यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.