Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकार्थ»इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा संघर्ष पेटला
    लोकार्थ

    इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा संघर्ष पेटला

    इराणने समुद्रातील ४ जहाजांवर मिसाइल डागल्या
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 29, 2026No Comments398 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पश्चिम आशियात इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा संघर्ष पेटल्याचे दिसून येत आहे. दोन्ही देशामध्ये तणाव पेटल्याने युद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे दोन्ही देशाची युद्ध समाप्तीसाठी करार करण्याची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी अमेरिका आणि इराण एकमेकांवर हल्ला करत असल्याचे समोर येत आहे. इराणने काल सामुद्रधुनीवर असलेल्या ४ जहाजांवर हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेचं फायटर जेट देखील पाडल्याचा दावा इराणने केला आहे. परंतु अमेरिकेने इराणचा दावा फेटाळून लावला आहे.

    होर्मुझची सामुद्रधुनी जगातील इंधनाच्या व्यापारासाठी महत्वपूर्ण आणि किफायतशीर समुद्री मार्ग मानला जातो. या मार्गातून जगातील जवळपास २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते. परंतु या मार्गावर जहाजांवर हल्ले होऊ लागल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील तणावाचा थेट शेअर बाजार आणि कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम होताना दिसत आहे.

    बुशहर प्रांताचे गव्हर्नर मसूद तंगेस्तानी यांनी विधान करत म्हटलं की, इराणी सैन्याने बुशहर क्षेत्रात अमेरिकेच्या सैन्य दलाचं विमान पाडलं. परंतु अमेरिकेने इराणचा दावा फेटाळून लावला आहे. इराणने अमेरिकेच्या कोणत्याही विमानाला नुकसान पोहोचवलं नाही.

    मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिका आणि इराणमध्ये ६० दिवसांत युद्ध थांबवण्याबाबत करार करण्यावर सहमती झाली आहे. परंतु करार करण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांची मंजुरी मिळालेली नाही. या कराराचा उद्देश हा पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याचा आहे. दोन्ही देशात शांततेसाठी करार होतो का, हे पाहावे लागेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कच्च्या तेलाच्या दरवाढीने भारताची चिंता वाढली

    September 15, 2026

    २,००० रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार पूर्णपणे निशुल्क

    September 15, 2026

    सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात फेरबदल

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif