Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    राजकारण

    संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती

    झारखंड आंदोलक विद्यार्थ्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 10, 2026No Comments157 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिल्लीच्या जंतरमंतरनंतर आता झारखंडच्या रांचीमध्ये परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन पेटलं आहे. गेल्या 17 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांनी आज सोमवारी झारखंडच्या विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

    पोलिसांचा मोठा फौजफाटा असतानाही विद्यार्थी आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवून विधानभवनाच्या दिशेकडे कूच केली. परंतु विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दिल्लीच्या जंतर-मंतरची पुनरावृत्ती रांचीमध्ये पाहायला मिळाली.

    झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी आंदोलकांनी आज विधानभवन मार्चचा नारा दिला होता. विद्यार्थ्यांच्या विधानभवन मार्चच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. विधानभवनाच्या परिसरात सैन्य दलातील 1500 तैनात करण्यात आले होते. आंदोलनावर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर केला जात आहे.

    एकीकडे सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे. त्यानंतरही विद्यार्थी माघार घ्यायला तयार नसल्याची माहिती मिळत आहे. खरंतर विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे रांचीमध्ये सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष पेटल्याचे समोर येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली

    September 6, 2026

    नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग

    September 6, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif