Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांची शोकसभा
    जळगाव

    ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांची शोकसभा

    स्मृतीस उजाळा व आदरांजली : विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 29, 2026Updated:June 29, 2026No Comments62 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    बालरंगभूमीवर आपले संपूर्ण आयुष्य जगणारे, आपल्या अष्टपैलू कलेने असंख्य बालकलावंत घडविणारे आणि बालप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जळगावचे लाडके नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांचे नुकतेच दीर्घकालीन आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने बालरंगभूमीची आणि सांस्कृतिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यासाठी आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दि. ३० रोजी जळगावात व.वा.वाचलनालयाच्या रामनारायण सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता ‘शोकसभा’ आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेस दिवंगत आत्म्यास आदरांजली वाहण्यासाठी व त्यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी सर्व नाट्यकलावंत, रसिक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा व समस्त जळगावकर नाट्यकर्मींतर्फे करण्यात आले आहे.

    स्मृतिप्रित्यर्थ विनामूल्य आरोग्य शिबिर

    स्व. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवनरंग विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे’ देखील आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा, अरुश्री हॉस्पिटल आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी आदी तपासण्या करण्यात येणार असून, हे शिबिर आज (दि. ३० जून) सकाळी ८:०० ते १०:०० वाजेदरम्यान अरुश्री हॉस्पिटल, तळमजला, महेश प्रगती हॉलजवळ, रिंगरोड, जळगाव येथे होणार आहे.

    हे आरोग्य तपासणी शिबिर सर्व नाट्यकलावंत व त्यांच्या कुटुंबियांसाठी पूर्णपणे विनामूल्य राहील. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व नाट्यकलावंत, रसिक आणि नागरिकांनी या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव, अरुश्री हॉस्पिटल व मुक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif