Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»लग्नासाठी धर्मांतराची अट : तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
    गुन्हे वार्ता

    लग्नासाठी धर्मांतराची अट : तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

    सोशल मीडियाद्वारे कळाले आत्महत्येचे कारण : प्रेयसीवर गुन्हा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 1, 2026No Comments637 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सांगली शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याने सांगलीतील एका 19 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी त्याचे सोशल मीडिया अकाऊंट्स चेक केले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी तरुणीविरोधात तक्रार दाखल केली.

    सांगली शहरात लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याने एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्वांक प्रमोद शेवाळे असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित तरुणीसह दोघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या मुलाच्या आई वडिलांना आणि नातेवाईकांना मृत दुर्वांकच्या मोबाईल मधील इंस्टाग्राम मधील वेगवेगळ्या अकाउंटवरील चॅट मधून काही गोष्टी समोर आल्या. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

    सांगली शहर पोलिसांनी दोघांच्याही सोशल मीडियाचा डाटा सायबर पोलिसांकडून मागविला आहे. मृत दुर्वांक शेवाळे हा पुणे येथे नोकरी करत होता. त्याच्या घराजवळच राहणाऱ्या वृद्ध महिलेकडे कोल्हापूरची एक तरुणी अधूनमधून येत होती. त्या दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, संबंधित तरुणीने लग्नासाठी आपला धर्म स्वीकारावा अशी अट दुर्वांकला घातली. या अटीमुळे दुर्वांक गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृतदुर्वांकच्या आई-वडिलांनी केला आहे.

    याप्रकरणी दुर्वांकच्या आईने शहर पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार संबंधित तरुणी व तिला मदत करणाऱ्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सांगली शहरात खळबळ उडाली आहे. तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. मयत दुर्गांक शेवाळे याच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात आणि शेवाळे कुटुंब यावर शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif