Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»खा. संजय पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध!
    जळगाव

    खा. संजय पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध!

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेची माफीची मागणी : प्रशासनाला दिले निवेदन
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 26, 2026No Comments88 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी आहे. असे असतानाही खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेली आक्षेपार्ह व अवमानकारक भाषा अत्यंत निषेधार्ह आहे, अशी तीव्र भूमिका गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेने घेतली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने जळगावात प्रशासनाला निवेदन देऊन खासदारांवर कठोर कारवाईची आणि त्यांच्या जाहीर माफीची मागणी करण्यात आली आहे.

    दि. 25 जून रोजी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांविषयी अत्यंत अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचे समोर आले आहे. लोकप्रतिनिधीच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, यामुळे पत्रकारांचा अपमान झाला आहे. हे कृत्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारांचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांना थेट बाधा पोहोचवणारे असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

    निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पत्रकार हे समाज आणि प्रशासन यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनतेचे प्रश्न, समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकार प्रामाणिकपणे करत असतात. अशा संवेदनशील परिस्थितीत जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांबाबत अपमानास्पद भाषा वापरली जाणे हे अत्यंत दुर्दैवी, खेदजनक आणि लोकशाहीला काळिमा फासणारे आहे.

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना, जळगाव जिल्ह्याच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. संबंधित खासदारांवर कायदेशीर व योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात यावी अशी आग्रही मागणी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेकडून करण्यात आली.

    या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक सचिव भगवान सोनार, खजिनदार ललित खरे, जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, कार्याध्यक्ष हेमंत पाटील, शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल, मनिष जोग, नरेंद्र पाटील, किशोर पाटील, योगेश सुने, पवन खंबायत, योगेश चौधरी, धर्मेंद्र राजपूत, संदीप वानखेडे, निखिल वाणी, विकास पात्रे, नाजनिन शेख, कल्पेश हिरवळकर, जगमोहसिंग ठाकुर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif