धरणगाव येथे ‘हात से हात जोडो’ अभियानाला प्रारंभ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

धरणगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे हात से हात जोडो अभियानाची दिनांक २४ जानेवारी रोजी धरणगाव तालुक्याचे निरीक्षक विजय महाजन व समन्वयक शरद महाजन यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरूवात करण्यात आली.

इंदिरा गांधी विद्यालय धरणगाव येथे झालेल्या या कार्यक्रमात धरणगाव शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सम्राट परिहार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर या अभियानाबद्दल निरीक्षक व समन्वयक यांनी मार्गदर्शन केले, त्यानंतर धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ. व्ही. डी. पाटील यांनी धरणगाव शहर व तालुक्यात राबविण्यात येणार्‍या हात से हात जोडो अभियानाबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमाला सी. के. आबा पाटील, महेश पवार, राजेंद्र पाटील, राजेंद्र न्हायदे, अनंत परिहार, रामचंद्र माळी, दिनेश पाटील, मच्छिंद्र चव्हाण, साजिद पटेल, गोपि पाटील, शेख बशीर, दगडू पाटील, नंदा महाजन, राजेंद्र ठाकूर, योगेश येवले, गाैरव चव्हाण व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.