Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»“1098” वर तक्रार अन् ९ बालकामगारांची सुटका!
    गुन्हे वार्ता

    “1098” वर तक्रार अन् ९ बालकामगारांची सुटका!

    तक्रारीने उघडकीस आला बालमजुरीचा काळा चेहरा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 15, 2026Updated:June 15, 2026No Comments199 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    बालकामगार विरोधी सप्ताहादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे बालमजुरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या एका तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ९ बालकामगारांची सुटका करण्यात आली. या कारवाईमुळे बालकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या प्रवृत्तींना मोठा धक्का बसला आहे.

    जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बालकामगार शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर ब्रह्मपुरी शहरातील एका खाणावळीत अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याची माहिती प्राप्त झाली. माहितीची शहानिशा केल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली.

    कारवाईदरम्यान ९ अल्पवयीन बालकामगार आढळून आले. सर्व बालकांची तातडीने सुटका करून त्यांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार त्यांच्या संरक्षण व पुनर्वसनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

    प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत. तसेच कामगार विभागामार्फतही आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

    नागरिकांना आवाहन..

    जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी ता. भुमे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बालकामगार, बालशोषण, बालविवाह किंवा संकटग्रस्त बालकांची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 चाईल्ड हेल्पलाईन वर संपर्क साधावा. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनेक बालकांचे आयुष्य सुरक्षित होऊ शकते.

    बालमजुरी हा केवळ कायद्याचा भंग नसून बालकांच्या भविष्यावर होणारा थेट आघात आहे. शिक्षणाच्या वयात कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या बालकांना मुक्त करण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेला समाजानेही सक्रिय साथ देण्याची गरज आहे. ब्रह्मपुरीतील कारवाईने हे सिद्ध केले आहे की, एका जागरूक नागरिकाच्या फोनमुळेही अनेक बालकांचे हरवलेले बालपण परत मिळू शकते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif