हप्ता बंद झालेल्या लाडक्या बहिणींना दिलासा; e-KYC दुरुस्तीला सुरुवात, 31 जानेवारीपर्यंत संधी

0

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेत चुकीची माहिती भरल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक लाभार्थी महिलांना 1500 रुपयांचा मासिक हप्ता मिळालेला नाही. अशा अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. शासनाकडून e-KYC दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून महिलांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

e-KYC मधील चुकीच्या नोंदींमुळे ज्या लाभार्थी महिलांचे पैसे अडकले होते, त्यांच्याकडून नव्याने अर्ज मागवण्यात येत आहेत. आज, 27 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत संबंधित महिलांनी आपल्या अंगणवाडी सेविकेकडे अर्जासह आवश्यक कागदपत्रे जमा करायची आहेत.

ई-केवायसी करताना काही कॉलम चुकीच्या पद्धतीने भरले गेल्यामुळे लाभ थांबल्याचे निदर्शनास आले होते. आता प्राप्त होणाऱ्या नव्या अर्जांचे प्रशासनाकडून क्रॉस-व्हेरिफिकेशन केले जाणार असून त्यानंतर संबंधित चुका दुरुस्त करण्यात येतील. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना पुन्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, अशी माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे.

ई-केवायसीमध्ये चूक झाली असल्यास काय करावे?
ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC मध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांनी 27 ते 31 जानेवारी या कालावधीत अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा.

यासाठी लाभार्थी महिलांना एक साधा अर्ज करावा लागणार असून,

  • आधार कार्डची झेरॉक्स प्रत

  • स्वयंघोषणापत्र

ही कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी लागणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे हप्ता बंद झालेल्या हजारो लाडक्या बहिणींना पुन्हा आर्थिक आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.