जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या समन्वयातून भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तसेच सकाळी ७:३० वाजता सरदार वल्लभभाई पटेल बहुद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने एकता रॅली चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश चौधरी यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेतली या कार्यक्रमास रासोयो स्वंयसेवक, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास महिला अधिकारी डॉ. कल्पना भारंबे यांनी केले.