चक्क कॉलेजमध्ये मुलींची तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या सोशल मीडियावर कोणते व्हिडीओ व्हायरल होतील ते सांगता येत नाही. कॉलजेमध्ये मुलींची जोरदार हाणामारी होत असल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नाशिकमधला असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत आहे. हाणामारीमध्ये मुली एकमेकींचे केस ओढताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. छोट्या गोष्टींवरून झालेले हे भांडण विकोपाला गेल्याचे दिसून आले. भांडण सोडवायला गेलेल्या तरुणीलाही व्हिडिओत मारहाण होताना दिसत आहे. अनेक विद्यार्थ्यांचा गराडा या तरुणींचे भांडण पाहत होते. दरम्यान यावेळी उपस्थित असलेल्या काहींनी या घटनेचा व्हिडीओ काढला. यासंदर्भात मुलींच्या पालकांना सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.