Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»कॉकरोच जनता पार्टीला आता राजकीय समर्थन
    राजकारण

    कॉकरोच जनता पार्टीला आता राजकीय समर्थन

    थेट प्रकाश आंबेडकर, अण्णा हजारे यांनी दिला पाठींबा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 24, 2026No Comments218 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    संपू्र्ण देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीची चर्चा रंगली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांचा झुरळ असा उल्लेख केला होता, त्यानंतर अभिजीत दिपके या तरुणाचे कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. देशभरातील तरूणांची साथ या पार्टीला मिळत आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये या पार्टीने भाजप आणि काँग्रेसला सोशल मीडियावरील फॉलोअर्सबाबत मागे टाकले होते. अशातच आता कॉकरोच जनता पार्टीला राजकीय नेत्यांकडूनही समर्थन मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीने नेते प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या पार्टीचे समर्थन केले आहे. या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

    वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांना म्हणाले की, ‘काळजी करू नका, कोणतीही अडचण असल्यास संपर्क करा.’ याआधी प्रकाश आंबेडकर यांनी, देशाच्या सीजीआयने माफी मागावी. त्यांनी केलेलं विधान हे त्या याचिकेबद्दल होत हे त्यांनी सांगायला हवं होत असं विधान केले होते.

    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही कॉकरोच जनता पार्टीचे समर्थन केले आहे. अण्णा हजारे यांनी म्हटले की, न्यायाधीशांनी युवकांना झुरळ कोणत्या उद्देशाने म्हणाले याबाबत विचार करावा लागेल. मात्र, याच झुरळ जनता पार्टीच्या मागे युवक उभे राहिले हे महत्त्वाचे आहे. झुरळ हे नाव जरी योग्य वाटत नसलं, तरी जनता या पार्टीच्या मागे उभी राहिली हे महत्वाचे आहे. युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे, त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही.’

    पुढे बोलताना हजारे यांनी म्हटले की, ‘केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा आहे. लोकायुक्त कायदा हा जरी संमत झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागतं की काय?’ असा सवालही अण्णा हजारेंनी उपस्थित केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग

    September 6, 2026

    बापटांवर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा सन्मान

    September 6, 2026

    सरकार हे कॉक्रोच जनता पार्टीसमोर झुकत आहे!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif