मुंबई : भारतीय शेअर मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अस्थिरता पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 पासून देशांतर्गत बाजार घसरणपंथीला आला आणि सलग सहा महिने शेअर मार्केटमध्ये पडझडीचे वर्चस्व राहिले तर अलीकडच्या दिवसांत बाजार सावरला असून पुन्हा तेजीच्या रुळावर परतला आहे. पण या दरम्यान, भारतीय शेअर बाजाराला मोठा धक्का बसला आहे.
भारतीय शेअर मार्केट गेल्या काही वर्षांत गुंतवणुकीसाठी लोकांच्या पहिल्या पसंतीस उतरला होता पण आता भारतातून गुंतवणूकदारांचा मोहभंग होताना दिसत आहे. होय, आता जपान पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर तैवान आणि दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो.
भारत आता आशिया खंडातील सर्वात पसंतीचा शेअर बाजार राहिलेला नाही आणि या बाबतीत भारत चौथ्या स्थानावर घसरला आहे. बँक ऑफ अमेरिका, नवीन अहवालात दावा करण्यात आला असून बँक ऑफ अमेरिकेच्या नवीन अहवालानुसार, आशिया पॅसिफिकमधील आवडत्या गुंतवणूक ठिकाणांमध्ये भारताचा शेअर बाजार आता चौथ्या स्थानावर घसरला तर जपानने पहिल्या स्थानावर आघाडी घेतली आहे. त्यानंतर तैवान आणि दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो. त्याचवेळी, या यादीत चीन पाचव्या स्थानावर, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि थायलंडचा क्रमांक लागतो.
अहवालानुसार, आता फक्त 10 टक्के फंड मॅनेजर भारतात जास्त गुंतवणूक करत आहेत, तर जपानमध्ये 32 टक्के, तैवानमध्ये 19 टक्के आणि 16 टक्के दक्षिण कोरियामध्ये गुंतवणूक करत आहेत. एनएसई निफ्टी गेल्या दोन महिन्यांपासून त्याच श्रेणीत अडकला आहे आणि त्यात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे अहवालात गुंतवणूकदारांच्या माघारीचे कारण मानले गेले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.