Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»हवामान»‘मुरासू’ चक्रीवादळामुळे वातावरणात बदल
    हवामान

    ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे वातावरणात बदल

    काही भागांत ऐन दिवाळीत धो धो पाऊस बरसण्याची शक्यता
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 4, 2026No Comments362 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही  न्यूज नेटवर्क

    बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आहे. या वादळाचा फटका आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीला बसणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवणार आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

    भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी सांगितले की, सध्या होत असलेल्या पावसामुळे धरणे भरण्याची शक्यता कमीच आहे. राज्यात येत्या सहा तारखेपासून हवामानात बदल होऊन थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होईल. येत्या चार दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस होणार नसला, तरी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात काल पुणे आणि नाशिक या काही ठिकाणीच पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्वत्र पाऊस होईल, अशी सद्यस्थिती नसल्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाने वर्तवला आहे.

    हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांत पाच नोव्हेंबर रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच, चार नोव्हेंबर रोजीही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आजही काही भागांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

    यंदा थंडीचे आगमन लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्येही उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हिवाळ्यातही उष्णतेचा प्रभाव जाणवू शकतो. या कारणास्तव यंदा हिवाळ्याचे आगमन लांबण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या मासिक अंदाजानुसार, गुजरात आणि राजस्थानमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागांनाही त्याची झळ बसण्याची शक्यता आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026

    E-20 पेट्रोल 420 इंधन : थेट पुराव्यांसह मोठा आरोप

    November 7, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif