Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण
    जळगाव

    जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण

    स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक परिसरासाठी विशेष उपक्रम
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 24, 2026No Comments55 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

    शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर विविध देशी वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

    यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जितेंद्र कुवर, उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) विजयकुमार ढगे, तहसीलदार श्री सूर्यवंशी, उमा ढेकळे तसेच ‘वी-ड्रीम सेवाभावी संस्था’ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध शाखाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून ती प्रत्येकाची दैनंदिन सवय बनली पाहिजे, असे सांगितले. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ, हरित व प्रसन्न ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या प्रत्येक रोपाचे संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

    या अभियानात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यालय परिसरातील स्वच्छता करून प्लास्टिक व इतर कचरा संकलित करण्यात आला. तसेच परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

    या उपक्रमामुळे शासकीय कार्यालय परिसर अधिक स्वच्छ, आकर्षक व पर्यावरणपूरक करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा समन्वय साधणारा हा उपक्रम इतर शासकीय कार्यालयांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांनी स्वच्छता राखण्याची व वृक्षांचे नियमित संगोपन करण्याची सामूहिक प्रतिज्ञाही यावेळी केली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif