शंकर बोरघरे
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
कबड्डी….कबड्डी…कबड्डी..म्हणत मैदान गाजवणारा दणकट खेळाडू हरवला? “पटात घे रे” मार थड रे, ” उचल रे” असे अनेक वाक्य जोराने ओरड एका एका पॉईंटसाठी विरोधी मैदानावरील संघातील खेळाडूसह पंचासोबत भांडण करून खेळ संपल्यावर हरला की जिंकला हे न बघता हास्यास्पद आलिंगन करून हातात हाता मिळवून सच्चे मैदान गाजवून रात्रभर पेंडाला मध्ये थंडीत का होईना बेसन सोबत कच्चा भाताचे जेवण करून स्पर्धा घेणाऱ्या मंडळाला योग्य सहकार्य करनारे नामवंत खेळाडू का बर दुर्मिळ होत चालले असा, सवाल आता संपूर्ण विदर्भातसह जिल्ह्यात सुध्दा अनेक प्रसार माध्यमातून किंवा सोशल मीडियातून होत आहे.
मैदानावर मातीत होणारे सामने विजयी संघाला डोक्यावर घेऊन थय थय नाचणारे समर्थक भल्याभल्यांची पाठ पाहणारे कुस्तीपटू कबड्डीत घडले आहेत. कबड्डीला जिवंत ठेवणारे जेष्ठ नामवंत खेळाडू ला डावलून विदर्भात भलतेच स्वयंघोषित आयाराम खेळाडू कबड्डी वर वर्चस्व ठेवून या मैदानी खेळाचा धंदा लावला असल्याचे येथील जेष्ठ खेळाडूंन कडून आरोप होत असतांना दिसत आहे. मात्र 2014 पासून कबड्डी चे संघ हळूच विदर्भातील हद्दपार कसे काय झाले, याचे नेमके कारण म्हणजे “टोंगरे” फोडून मोंडा तोडून हनुमान उडी मारत मैदान गाजवत विजय मिळवून देणारा खेळाडू म्हणतो “काय करू माझा, कडे पैसैच नाही”
एकीकडे बघता महाराष्ट्र कबड्डी संघ हरियाना, सर्विसेस, दिल्ली सारख्या बल्लाढ्य संघावर मात करण्याची तयारी करत असते, आपल्या विदर्भातील पारंपरिक कबड्डी हरवली जात आहे. विदर्भातील खेळाडूंवर अयोग्य तांत्रिक अन्याय मुळे खेळाडू कबड्डी पासून वंचित राहून कबड्डीचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता येत असल्याच्या खंत व्यक्त येथील जेष्ठ खेळाडूंन कडून होत आहे.
आज आपल्या विदर्भाच्या कबड्डी मध्ये जवळपास 2014 कबड्डि लाखो रुपये मागणाऱ्या लोकांच्या हाती गेली. तेव्हापासून विदर्भातील अनेक मंडळ डबघाईस आले. आज कबड्डीचा विचार जर केला तर कबड्डी फक्त पैशावर अवलंबून आहे. विदर्भात अनेक मंडळाला खेळण्यास बंदी आणण्यात आली. सध्या विदर्भाच्या खेळाडूसाठी मोर्शी हेच कबड्डीचे माहेरघर आहे. प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी मुला-मुलींचा कबड्डीचा कॅम्प लावला जातो स्वखर्चाने, आणि जो पैसा देईल त्याला राष्ट्रीय खेळास पात्र ठरविण्यात येते विदर्भाच्या कबड्डीमध्ये काही बाहेर राज्याचे खेळाडू खेळवले जातात त्यांच्याकडून सुद्धा अमाप पैसा घेतल्या जातो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी यांच्या विरोधात काम करत आहेत. आठ ते दहा वर्षे झालेत आम्ही अशा होणाऱ्या अन्याय विरोधात कोर्टात प्रकरण दाखल केले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही मंडळाला कबड्डी सामने खेळण्यास मज्जाव केला आहे. अमरावती, चंद्रपूर, नागपूर, अकोला या ठिकाणी ग्रामीण कबड्डी सुरू केली आहे. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये दोन असोशियन निर्माण करण्यात आल्या आणि ग्रामीण भागातील ज्यांना सेक्रेटरी बनवले त्यांच्याकडून काहीतरी चिरीमिरी घेऊन जिल्ह्यामध्ये दोन पदाधिकाऱ्यांच्या असोसिएशन तयार केल्या आहेत. सध्या खेळाडू मात्र विदर्भामध्ये यांचा विरोधात बोलले तर त्या संघावर बंदी घालण्यात येते. म्हणून चुप्पी घेऊन कबड्डी खेळत आहे. यांच्या विरोधात आम्ही फक्त काही सीनियर खेळाडू काम करत आहोत. विदर्भाच्या कबड्डीला जुनं वैभव मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या विदर्भाची कबड्डी भ्रष्टाचाराने मलीन झालेली आहे. विदर्भातील जुने खेळाडू आहेत त्यांना माझा आवाहन आहे की, त्यांनी सुद्धा आमच्या लढाईत सामील व्हावं आणि या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करीत या विदर्भातून कबड्डीतला भ्रष्टाचार मुक्त कराव येणाऱ्या पुढील पिढीला न्याय मिळवून देऊ यांना अशा भ्रष्टाचार करणार्यांना हद्दपार करण्यासाठी संघटित व्हावेत.
पुरुषोत्तम नारायण आगलावे
जेष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू,
विदर्भ, नागपुर