Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»आज दिल्ली जंतर-मंतरवर सीजेपीचा संग्राम गाजणार!
    संपादकीय

    आज दिल्ली जंतर-मंतरवर सीजेपीचा संग्राम गाजणार!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 9, 2026No Comments81 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सीजेपीच्या वतीने होणाऱ्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. याबाबतीत नवी दिल्ली राजधानीमध्ये अघोषित आणीबाणी घोषित झाली आहे. म्हणजे नवी दिल्लीतील एकूण 57 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. मुख्य ट्रेन ज्या आहेत, त्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण 35 हजार जवान जंतर-मंतरवर तैनात करण्यात आले आहेत. हे केवळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे, या मुख्य मागणीसाठी आहे. पण ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू राहणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने अभिजीत दीपके, सौरभदास आणि अशितोष रांका यांनी आपल्या आंदोलनातील रणनीती कशी असेल, याबाबत अद्याप काही गोष्टी जाहीर केलेल्या नाहीत. कारण या तिघांना एका कायद्याअंतर्गत अटक करण्याचा घाट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आहे, असे दिसते. या तिघांना अटक केली तर फार मोठे अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. देश पेटून उठेल अशी परिस्थिती निर्माण होईल. अटक करण्यात येईल, असे अभिजीत दीपके आणि इतरांना वाटते आहे. पण या अटकेला आम्ही कदापिही घाबरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीत सुप्रीम कोर्टाचे दरवाजे या कॉक्रोच जनता पार्टीने ठोठावले आहेत.

    प्रसिद्ध वकील कपिल सिंबल यांनी म्हटले आहे की, या देशात चालले आहे काय? शांततेच्या मार्गाने कुठलेही आंदोलन करता येत नाही. सरकारला याची इतकी भीती आहे की, त्यामुळे 35,000 पोलीस राजधानी दिल्ली येथे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या लोकांना नोटिसा दिल्या आहेत. त्या दिलेल्या नोटिसा कॉक्रोज जनता पार्टीने फाडून टाकाव्यात, असे अनेकांचे मत आहे. सीजीपीच्या दहा हजार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व बसेस, सर्व ट्रेन, सर्व विमाने बंद करण्यात आली आहेत. यासोबत इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. ज्या प्रमाणात बसेस, ट्रेन आणि विमाने बंद करून काही होणार नाही. आज नाही तर उद्या कार्यकर्ते नवी दिल्ली येथे येतील आणि हे जंतर-मंतरवरील आंदोलन दहा तारखेला सुरू होईल. त्या दिवसापासून हे आंदोलन पुढे चालू राहील. त्यामुळे हे एक दिवसापुरते आंदोलन न राहता ते सतत पुढे सुरू राहील. गेले चार दिवस झाले, राहुल गांधी दिल्लीत आंदोलन करत आहेत. आता राहुल गांधींना अटक करून त्यांना नंतर सोडून देण्यात आले आहे.

    गेल्या दोन ऑक्टोबरपासून नवी दिल्ली येथील जागरूक नागरिक, योगेंद्र यादव, प्रसिद्ध भूषण, नेहा बोरा आदी नागरिक आंदोलन करत आहेत. त्यांचेही आंदोलन चालू राहील. परंतु धक्कादायक बातमी म्हणजे, नवी दिल्लीमध्ये हॉस्टेल आणि लाजेसमध्ये आंदोलन करणारे कुणीही असतील, तर त्यांना तुम्ही खोली देऊ नका, असे त्या लॉज मालकांना सांगितले जात आहे. अशा प्रकारे पोलिसांचा वापर करून दडपशाही केली जाणे म्हणजे जनतेचा विश्वास उडालेला असून भाजप सरकार हे फार घाबरले आहे. उद्या दहा तारखेला काय होईल, हे सांगता येत नाही. सुप्रीम कोर्टात हा खटला पोहोचला. त्यात अशा प्रकारे रेल्वे, बसेस, विमाने आणि मेट्रो रेल्वेसह इंटरनेट बंद करण्यात येत आहे. ही काही चांगली गोष्ट नाही. पण अशा प्रकारे सरकार दडपशाही करते, हेही खरे आहे. कोर्टात सॉलिसिटर जनरल यांनी, आम्ही तुम्हाला दुसरी जागा देण्याचा विचार करू, असे सांगितले. पण केव्हा करणार? उद्या आंदोलन सुरू होणार असून आता सॉलिसिटर जनरल म्हणतात की, त्यांना दुसरी जागा आंदोलनासाठी देणार. हे काही शक्य नाही. ही हुकूमशाही वाटचाल सुरू आहे. त्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते उद्या दहा तारखेला जंतर-मंतरवर जाऊन तेथे आम्ही आमच्या बाळाचा वापर करू, असे म्हटल्याचे त्यांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत आणि त्या व्हिडिओला मात्र सरकारने विरोध केला नाही. आता कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने किती लोक तेथे येतील, हे सांगता येणार नाही. पण तरुण वर्ग कुठून ना कुठून जंतर-मंतरवर पोहोचणार, एवढे मात्र निश्चित…!

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव

    November 8, 2026

    दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!

    November 7, 2026

    जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif