जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क
अचानक दुचाकी समोर कार आल्याने झालेल्या अपघातात शहरातील ४४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वा. घडली. नीलेश केशव बारी (वय ४४) असे या व्यक्तीचे नाव आहे.
जळगाव शहरातील शास्त्रीनगरातील रहिवासी नीलेश केशव बारी (वय ४४) हे शेती करून शनिवारी रात्री सागर पार्ककडून दुचाकीने घराकडे जात होते. दरम्यान अचानक त्यांच्या दुचाकी समोर कार आल्याने ते त्या कारवर धडकून मोठा अपघात झाला. या अपघातात बारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.
दरम्यान एका तरुणाने त्यांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. अमोल पाटील यांनी मृत घोषित केले. निलेश बारी यांच्या खिशातील असलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. याबाबत त्यांच्या परिवाराला कळवले असता रुग्णालयात त्यांच्या वडील व पत्नीने मृतदेह पाहताच प्रचंड आक्रोश केला.