समाजकार्यात तरुणांनी कर्तृत्वान होणे आवश्यक – राजेश यावलकर

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तरुणांनी समाज कार्यात आघाडीवर राहून कर्तृत्ववान असणे आवश्यक आहे सर्वच नकारात्मकतेचे विचार सोडून एकजुटीने एकत्र येऊन सकारात्मक विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे मत चिवास मराठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेश यावलकर यांनी वरणगाव शहरातील चितोडे वाणी समाजाच्या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आयोजित कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी मांडले.

समाजातील जेष्ठांनी आपल्या पाल्यावर चांगले संस्कार घडवावे व त्याच्यातील कला गुणांना वाव मिळण्यासाठी प्रोत्साहित करावे. सोबत आपल्यातला नकारात्मक विचार सोडून द्यावा. मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाकरीता त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी, व्यवसाय हया सर्व आवश्यक आहे पण गरजेच्या नाही. मात्र त्यासोबत त्यांचे व्यक्तिमत्व सुद्धा महत्वाचे आहे. मुलगा आणि मुलगी दोघांवर जर योग्य संस्कार असतील तर घटस्फोटासारखे प्रकार होणार नाही. विवाह जुळवताना वेळ घ्या पण वेळ लावू नका. लवकर निर्णय घ्या असेही यावलकर यांनी यावेळी सांगितले.

दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन वरणगाव शहराचे समाजध्यक्ष अनंत गडे व मनोहर सराफ यांचे हस्ते दिप प्रज्वलीत करून करण्यात आले. जळगाव येथील चितोडे वाणी समाज जळगाव शहराध्यक्ष प्रा. डॉ. उमेश वाणी यांनी समाज संघटन कसे आणि का आवश्यक याचे महत्व प्रमुख अतिथी म्हणून यावेळी बोलताना विषद केले. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा समाज कार्यात सर्वार्थाने सहभाग आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी मार्फत सुरू असलेल्या सर्व कार्याची माहिती दिली.

उद्घाटनानंतर वकृत्व, रंगोळी, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी मंचावर वरणगाव चिवास अध्यक्ष अनंत गडे, मनोहर सराफ, उमेश वाणी, दिलीप नवगाळे, बऱ्हाणपूर येथील अजंली वाणी उपस्थीत होते. समाजाचे राष्ट्रीय स्तरावरील महिला संघटनबाबत अंजली वाणी यांनी माहिती दिली.
तर दुसऱ्या दिवशी समाजाची सर्व साधारण बैठक झाली. यावेळी समाजाच्या घटनेत अमुलाग्र बदल करण्याचा व समाज हिताचा निर्णय घेण्यात आला. वरणगाव शहरात समाज कार्यासाठी कायमस्वरूपी वास्तू उभारण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.

यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेंद्र वाणी, मनोज वाणी, विनोद श्रावगे, महेश गोडबोले, सचिन सराफ, वैभव गोडबोले, मोहन नवगाळे, प्रितेश वाणी, अनिल पितळे, मिलिंद पितळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.