Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»चंद्रपूर शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त
    ताज्या बातम्या

    चंद्रपूर शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त

    तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 24, 2026No Comments42 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    चंद्रपूर शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः बंगाली चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज तसेच बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज या मार्गांवरील रस्ते अत्यंत खड्डेमय झाले असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    सध्या पावसाळा सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे ओळखणे कठीण होत असून, अचानक वाहन खड्ड्यात गेल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिकांनाही या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजु एन. शंभरकर यांनी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, शहरातील प्रमुख मार्गांवरील खड्डे त्वरित बुजवून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि चंद्रपूर महानगरपालिकेने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

    “रस्त्यांवरील खड्डे हे केवळ गैरसोयीचे नसून नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण करणारे आहेत. त्यामुळे बंगाली चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज तसेच बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज या मार्गांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजु एन. शंभरकर यांनी केली आहे.

    नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    October 3, 2026

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    October 3, 2026

    ‌‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाइन!

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif