वॉचमन दुसऱ्या साईटवर गेले अन चोरट्यांनी बांधकाम साहित्य लंपास केले!
जळगाव – पुलाच्या बांधकामस्थळी देखरेखीसाठी नेमलेले वॉचमन दुसऱ्या साईटवर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधत सेंट्रिंगचे १६ लोखंडी प्लेट, १५ लोखंडी जॅक आणि ९ लोखंडी सोल्जर चोरून नेले. ही घटना ११ मार्च रोजी बीबा नगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नवीन पोस्टल कॉलनी येथे राहणारे कैलास पंडीत भोळे हे कॉन्ट्रॅक्टर असून, राष्ट्रीय महामार्गालगत बिबा पार्क नगर येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. या साईटवर मुरलीधर पाटील हे वॉचमन म्हणून कार्यरत आहेत.
१० मार्च रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ते साईटच्या एका भागात होते, त्यावेळी बांधकामाचे साहित्य जागेवरच होते. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्री त्यांनी साईटवर पाहणी केली असता साहित्य गायब असल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच कैलास भोळे, त्यांचा मुलगा गिरीश भोळे, तसेच नरेंद्र पाटील, समाधान पाटील, रविंद्र भोळे आणि शुभम आवारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरीचा अंदाज घेतल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, चोरट्यांनी बांधकाम साहित्य कुठे आणि कसे नेले याचा शोध घेतला जात आहे


