छतावरील पत्रे कापत चोरट्यांनी 50 हजारांची रोकड केली लंपास

0

जळगाव :- दुकानाच्या छतावरील पत्रे कापत चोरट्यांनी प्रवेश करून 50 हजारांची रोकड लांबविल्याची घटना . प्रताप नगरातील मनियार नामक होलसेल दुकान येथे रविवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता घडली . याप्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील प्रताप नगरातील मनियार होलसेल दुकान असून 10 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता दुकान बंद करून सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर चोरट्यांनी होलसेल दुकानाचे पत्रे कापून आत प्रवेश केला. कॅश काऊंटरमधील 20 हजारांची रोकड तसेच एचडीएफसी बँक, कोटक, बंधन, देवनागरी व शिरपूर बँकेचे कोरे चेक व कपाटातील 30 हजारांची रोकड मिळून एकूण 50 हजारांची रोकड लांबवली. चोरीचा प्रकार रविवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. दुकान मॅनेजर चेतन विजय सुलक्षणे (31, अयोध्या नगर, जळगाव) यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हवालदार पल्लवी मोरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.