उभ्या असलेल्या चार रिक्षांची चोरली चाके

0

जळगाव : मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर उभ्या असलेल्या चार रिक्षांची चाके चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना शनिवारी खडके चाळ व नामदेव नगरात उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील रिक्षा चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील शिवाजी नगर परिसरातील खडके चाळ व नामदेव नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री मध्यरात्री २ ते ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी अफसर शेख सत्तार (वय २४), प्रमोद मांडोळे ( वय – ३५), महेंद्र पाटील, शाहरुख शेख यांच्या (एमएच १९ सीडबल्यू २१९४), (एमएच १९ सी ५५५८),

(एमएच १९ सीडबल्यू २९९९ ) व (एमएच १९ व्ही ५६५८) या क्रमांकाच्या रिक्षा परिसरात १०० मीटर अंतरवर उभ्या होत्या. त्या चार रिक्षांचे प्रत्येक दोन चाके काढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका रिक्षा चालकाचे किमान ४ हजार ते ५ हजारपर्यंत नुकसान झाले आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

रिक्षाचालकांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार किशोर निकुंभ यांनी घटनास्थळी भेट देवून परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.