दुचाकी आणि गुरांची चोरी करणारा सराईत गुन्हेगार एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

0

जळगाव : चोरीप्रकरणात फरार असलेल्या अमजद फकीरा तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून शहरात चोरीला गेलेल्या गुरांची  चोरी केल्याचे चौकशीत समोर आले. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

२९ जून २०२३ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रेमंड कंपनीच्या गेट समोरुन जितेंद्र एकनाथ चौधरी (रा. खेडी) यांची दुचाकीची (क्र. एमएच १९, बीटी ८३०२) चोरी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात यापूर्वी गोपाल भाईदास शिरसाठ, रा. पिळोदा ता. शिरपूर यास अटक करण्यात आली होती. त्याचा दुसरा साथीदार अमजद फकीरा कुरेशी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो जळगाव येथे आल्याचीमाहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सुधीर सावळे, इम्रान सैय्यद, विकास सातदिवे, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मंढे यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता शहरात चोरीला गेलेल्या गोह्याची चोरीदेखील त्यानेच केल्याचे समोर आले. त्यात अमजद कुरेशीला अटक करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी पपोलीस कोठडी सुनावली .

दरम्यान संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अमजद कुरेशी याची कसून चौकशी केली असता, त्याने मास्टर कॉलनीतील इक्बाल हॉलजवळील मोकळ्या जागेत बांधलेला गोऱ्हा चोरी केल्याचे उघड झाले आहे. तसेच यापूर्वी त्याच्याविरुद्ध दुचाकी चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.