चोपडा पिपल्स बँक निवडणुकीत “सहकार” पॅनलचा विजय

0

 

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या दि चोपडा पिपल्स को-ऑप. बँक लि. चोपडा ता. चोपडा जि. जळगाव. ची सन २०२२ ते २७ या कालावधीची सर्वसाधारण पंचवार्षिक निवडणूक दि. १३ रोजी पार पडली. आज रोजी त्याचा निकाल जाहिर करण्यात आला.

यावेळी एकुण ८ जागेसाठी मतदान झाले. त्यामध्ये विद्यमान चेअरमन चंद्रहास गुजराथी यांच्या सहकार पॅनलने बाजी मारत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवला.

यामध्ये विजयी उमेदवार

अग्रवाल अशोक मगनलाल – १३६६,

देसाई सुभाष प्रभाकर – १४१२,

गुजराथी आशिष सुभाषलाल – १५३६,

गुजराथी चंद्रहास नटवरलाल – १६०३,

सुनिल शंकरलाल गुजराथी – १३९४,

जैन कैलास शिखरचंद – १२२२,

जैन नेमीचंद सुकलाल – १३९३,

जैन सुनिलकुमार तिलाकचंद – १३९६

सदर निवडणुकीमध्ये चार उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीमध्ये वैध मतपत्रिकेची संख्या १९१९ असून अवैध मतपत्रिकेची संख्या ६१ अशी आहे.

सदर निवडणुकीमध्ये निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अमळनेर येथील सहा. निबंधक के. पी. पाटील यांनी तर सहा. निवडणुक अधिकारी म्हणून सहकार अधिकारी डि. आर. पुरोहीत यांनी काम पाहिले. त्याबरोबर बँक व्यवस्थापक मितेश पोतदार, लिपिक प्रदिप सोनार व शिपाई योगेश गुजराथी यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.