Thursday, August 11, 2022

चोपड्यात मयूर म्यूझिक गृपने गाजविली ‘पाडवा पहाट’; अरुणभाई गुजराथींची भैरवी रंगली

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

चोपडा;  येथील संगीत शिक्षक वसंत मयूर यांनी २ एप्रिलला आयोजित केलेला पाडवा पहाट अभंग भजन व वाद्य वादनाने खूप रंगला.कार्यक्रमाची सुरवात मनोज चित्रकथी यांच्या ॐकार स्वरुपाने झाली.जळगावचे डोळ्यांचे​ सुप्रसिद्ध डाॅ.अभय गुजराथी जळगावहून खास या कार्यक्रमासाठी येऊन भजन सादर केले.

- Advertisement -

- Advertisement -

डाॅ.लोकेंद्र महाजन, डॉ.आर्. सी. गुजराथी ,प्रिती गुजराथी,सरिता टाटीया यांचा अभंग तसेच हेमश्री पाटील हिने पेटीवर वाजविलेला मालकंस राग, सत्यम सोनवणे,लिना सोनवणे, तुषार बागुल,पार्थ गुजराथी यांनी सादर केलेली तबला जुगलबंदी सोबत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या भैरव रागाच्या सादरीकरणाने  कार्यकमाची रं‌गत खूप वाढली

या कार्यक्रमात भावना गुजराथी, दिपाली धनगर ,गायत्री रनाळकर, जयश्री महाले यांनी सुद्धा अभंग,भजन सादर केले होते.सच्चिदानंद भारती यांच्य भैरवी रागाने कर्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत शिक्षक वसंत मयूर यांनी केले.या कार्यक्रमात अॅड. संदीप पाटील,.डाॅ.विकास हरताळकर, माधुरीताई मयूर, गोविंदभाई गुजराथी,  ,विकासभाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या