Wednesday, August 10, 2022

चोपड्यात घराचा कडी- कोयंडा तोडून सोन्याच्या दागिनेसह २२ हजार लंपास

- Advertisement -

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

चोपडा शहरातील एका घराचा कडी व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील गोदरेज कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रकमेसह २२,५०० / – रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना चोपड्यातील आदर्श नगरात शनिवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली. पत्रकाराच्या घरी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शहरातील आदर्श नगरातील रहिवाशी मिलिंद देवराम सोनवणे (वय ४४, धंदा- पत्रकार) यांनी खालच्या मजल्याच्या दरवाज्याला कुलुप लावून ते कुटुंबासह वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. रात्री २ वाजता पत्रकार सोनवणे यांची मुलगी अभ्यास करत होती. तिला कोयंडा तोडल्याचा आवाज आल्याने तिने सदर प्रकार वडिलांना सांगितला असता तेव्हा सोनवणे यांनी घरासमोर राहणाऱ्या ओळखीच्या लोकांना फोन लावून विचारले असता त्यांनी सांगितले की, तुमच्या खालच्या खोलीसमोर दोन अज्ञात इसम उभे असल्याचे दिसत आहेत.

तात्काळ पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी शहर पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली. पाच मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. विशेष म्हणजे अज्ञात चोरट्यांनी मिलिंद सोनवणे झोपले होते त्या वरच्या मजल्यावरील खोलीला बाहेरून कडी लावली होती. पोलीस आल्यावर ती कडी उघडली तेव्हा सोनवणे बाहेर आले.

यावेळी त्यांनी पोलिसां समक्ष खालच्या मजल्याची पाहणी केली असता त्यांना दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून लहान कपाटातील एक छोटी पर्स मध्ये ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप व रोख रक्कम ७,५३० / रुपये चोरून पोबारा केल्याचे आढळून आले. या बाबत मिलिंद सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवि ४५७, ३८० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग मार्गदर्शनाखाली पाटील करीत आहेत

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या