free grocery coupons australia discontinued gum brands ramm exeter gift shop the ultimate gift video clips the gift looks good on you praise dance clorox toilet wand refills coupon 2012
Friday, December 2, 2022

धक्कादायक: अल्पवयीन मुलीला पळवून तीन दिवस अत्याचार

- Advertisement -

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

चोपडा शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोपडा शहरात बहिणीकडे रहायला आलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देवून पळवून नेवून वेगवेगळ्या ठिकाणी ३ वेळा शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पिडीत मुलीला तिच्या मूळगावी आणल्यानंतर तिने चोपडा पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा रा.कालीकुंडी ता. वरला जि. बडवाणी (मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशातून दि. ८ जुलै २०२२ रोजी पिडीत मुलगी तिच्या बहीणीकडे चोपडा येथे राहायला आली होती. त्यादरम्यान पीडितेच्या बहिणीने, “गावामध्ये तु सचिनच्या नावाने बदनाम झाली” असे सांगितल्याने दोघींमध्ये भांडण झाले. त्यामुळे पीडित तरुणीने आरोपी सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा रा.कालीकुंडी ता. वरला जि. बडवाणी ( मध्य प्रदेश) यास फोन करुन तिला घेवुन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे दिनांक २९ जुलै २०२२ रोजी पिडिता चोपडा शहर बस स्थानकावर आल्यानंतर, संशयित आरोपी सचिन याने सदर ठिकाणी येवुन पीडित तरुणीस तुझ्यासोबत लग्न करायचे असल्याचे सांगुन तिला बसने लकडीया (महाराष्ट्र) येथे नातेवाईकांकडे घेवुन गेला.

- Advertisement -

दरम्यान याठिकाणी एक दिवस राहील्यानंतर हरीयाणा येथील संशयित आरोपी सचिन याचा मित्र राहुल यांच्या घरी ४ दिवस राहीले. त्या ठिकाणी संशयित आरोपी याने पीडित तरुणीच्या संमतीशिवाय ३ वेळा शारीरीक संबंध केले. त्यानंतर तेथुन सेंधवा (मध्य प्रदेश) येथे आरोपीच्या नातेवाईकाच्या घरी येवुन तेथे देखील संशयित आरोपी याने शारीरीक संबंध केले.

यानंतर वरला येथे मुळगावी आल्यानंतर पीडित तरुणीने वरला पोलीस स्टेशन जि. बडवानी मध्य प्रदेश येथे दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी तक्रार दिली असुन, वरला पोलीस स्टेशन येथे ०० / २०२२ प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाची कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयामार्फतीने आज रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली आहेत. याप्रकरणी पुढील तपास पो.नि संतोष चव्हाण हे करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या