अभिनेते समीर चौघुले ७ रोजी चोपड्यात दर्पण पुरस्कारांचे होणार वितरण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा; येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दर वर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या व्यक्तींना मानाच्या दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येत असते. यावर्षी हा पुरस्कार सोहळा गुरुवार दि.७ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५ : ३० वा. आनंदराज

पॅलेस चोपडा येथे संपन्न होणार आहे.यावेळी सुप्रसिध्द मराठी हास्य अभनेते श्री.समीर चौघुले यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या व्यक्तींना ‘ दर्पण २०२२ ‘ यामानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दर्पण पुरस्कार २०२२ या पुरस्कारासाठी नवोदित कलाकार कु.स्वराली पंकज पाटील, रावेर येथील प्रतिथयश डॉ.प्रवीण डी.चौधरी, चोपडा येथील पंकज समूहाचे संचालक तथा रोटरी अध्यक्ष पंकज सुरेश बोरोले,ऍड.संजय सरदारसिंग पावरा शिरपूर,सहा.पोलीस निरीक्षक उमेश शामराव बोरसे थाळनेर,सुभाष

मगनलाल अग्रवाल चोपडा,प्रकाश फुलचंद चौधरी चोपडा,दत्तात्रय दयाराम पाटील अमळनेर,डॉ.पवन डोंगर पाटील,सौ.आशा नामदेव सोनवणे चोपडा,भूषण कांतीलाल बाविस्कर अहमदाबाद,सैय्यद अमजदभाई चोपडा,योगेश मधुकर सोनवणे चोपडा,विष्णूअर्जुन दळवी शहादा,सौ संध्या नरेश महाजन चोपडा,शिवाजी अण्णा पाटील एरंडोल,नेमीचंद

सुकलाल जैन चोपडा,दिनेश चंपालाल पाटील चोपडा,नरेंद्र रायसिंग भादले सत्रासेन,किरण शालीग्राम पाटील कुसुंबा,सौ अरुणा रामदास कोळी चोपडा,सचिन फुलचंद चौधरी चोपडा, पारस जवरीलाल राका जळगाव,मोहन बाबूलाल बागमार पुणे,नितीन प्रभाकर सपके जळगाव यांची निवड करण्यात आली असूनजीवनगौरव पुरस्कारासाठी जळगाव येथील प्रसिध्द व्यावसायिक,ज्यांनी आपला व्यवसाय

सांभाळत असतांना सामाजिक नाळ जुळवून ठेवली आहे.बेवारस व अनाथ मुलींचा दरवर्षी विवाह समारंभ आयोजित करून त्यांचा खर्च उचलुन त्यांना मुख्य प्रवाहात आणून अख्खी पिढी घडवणारे ओमसाई रिअल इस्टेटचे सर्वेसर्वा श्री.रमेशकुमार मुणोत यांची सार्थक अशी निवड करण्यात आली आहे.हे सर्व पुरस्कार मराठी अभिनेते समीर चौगुले यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार असून या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथीप्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.कैलासबापू पाटील, जगदीशचंद्र वळवी,प्रा.चंद्रकांतअण्णा सोनवणे,आमदार सौ लताताई सोनवणे,मा.नगराध्यक्षा,सौ.मनिषाताई चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमाला उपस्थितिचे आवाहन प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष शाम जाधव,उपाध्यक्ष डॉ.निर्मल टाटीया,सचिवलतीश जैन,संचालक संजय बारी,हिरेंद्र साळी,सौ लता जाधव,चेतन टाटीया,आकाश जैन, विश्वास वाडे,ऍड.अशोक जैन,निलेश जाधव, अतुल पाटील,सौ.योगिता पाटील आदींनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.