Sunday, November 27, 2022

चोपडा तालुक्यात मुबलक खत बियाण्यांची उपलब्धता – कृषी विभाग

- Advertisement -

लासुर ता. चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

खरीप हंगामास सुरुवात झाली असून ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे. अशा शेतकऱ्यांनी १ जून नंतर कापूस लागवड सुरू केलेली आहे. कोरडवाहू क्षेत्रावरील पेरणीसाठी शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत आहेत. बाजारात कोणकोणते कापूस, मका, सोयाबीन, उडीद, मग इत्यादी पिकांचे बियाणे उपलब्ध झाले आहे.  कोणत्या कंपन्यांनी कोणते नवीन वाण बाजारात आणले आहे याची माहिती घेतांना शेतकरी बांधव दिसत आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

कृषि विभागाकडील प्राप्त माहिती नुसार तालुक्यात कापूस बियाण्याची  १ लाख ७५ हजार पाकिटे उपलब्ध आहेत. सोबतच मका, सोयाबीन, उडीद, मग या पिकाचे देखील पुरेपूर बियाणे साठा उपलब्ध झाला आहे. देशी संकरित कापूस वाणांस देखील शेतकरी पसंती देताना दिसत आहेत. कोणत्याही एका विशिष्ट कंपनीच्या विशिष्ट वाणाची मागणी व लागवड शेतकऱ्यांनी करू नये. कारण कीड, रोग व वातावरण बदल यामुळे संपूर्ण क्षेत्राचे नुकसान होण्याचा धोका असतो. म्हणून वेगवेगळ्या पिकांची व वाणांची पेरणी करून वरील संभाव्य धोका टाळण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

तालुक्यात आज मितीस ४००० टन युरिया, ३००० टन सुपर फॉस्फेट, ७०० टन पोटॅश, तर ३५० टन डीएपी, १५०० टन विविध प्रकारची कॉम्प्लेक्स खते व ५०० टन मिश्र व सेंद्रिय खते उपलब्ध असल्याची माहिती कृषि विभागाने दिली आहे.

जादा दराने विक्री, बिगर बीलाने विक्री, बियाणे, खते उपलब्ध असून विक्री न करणे असे आढळून आल्यास कृषि विभागाकडे लेखी तक्रार नोंदविण्याचे आवाहन शेतकरी बांधवांना केले आहे. १०.२६.२६; डीएपी सारख्या खतांची उपलब्धता तुलनेने कमी असल्याने व खतांचे वाढलेले दर पाहता शेतकरी बांधवांनी युरिया, सुपर फॉस्फेट व पोटॅश खताच्या मिश्रणातून ह्या ग्रेड घरी तयार कराव्यात व खर्चात बचत करून उत्पादन वाढवावे असे देखील आवाहन कृषि विभागाने केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या