dove mens face wash coupon musicians friend 20 percent off coupon ringling brothers circus coupons 2012 automobile magazine gift subscription
Thursday, December 1, 2022

धक्कादायक.. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

- Advertisement -

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

चोपड्या तालुक्यामधील एका गावातील २५ वर्षीय महिलेला व्हिडीओ आणि फोटो व्हॉटसअॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शुभम अशोक पाटील, प्रफुल्ल दिलीप पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

२५ मार्च रोजी शुभम अशोक पाटील (रा. घुमावल बुद्रुक ता.चोपडा ) याने २५ वर्षीय महिला घरात एकटी असतांना तिच्या घरात स्वयंपाक रुममध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन महिलेचे तोंड दाबून व्हीडीओ कॉल करुन काढलेले व्हीडीओ व फोटो व्हॉटसअँपवर टाकुन बदनामी करण्याची धमकी देवून जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच महिलेने आरडा ओरड केल्यानंतर पळून गेले.

- Advertisement -

दरम्यान सदर घटनेबाबत महिलेने पती, सासू, सासरे यांना सांगितल्यानंतर याप्रकरणी जाब विचारण्यासाठी सासु, सासरे गेले होते. यावेळी शुभम पाटील व प्रफुल्ल पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली.

याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शुभम अशोक पाटील, प्रफुल्ल दिलीप पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. अवतारसिंग टी . चव्हाण करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या