आदिवासी तरुणाच्या गुप्तांगावर वार करून खून

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

३० वर्षीय आदिवासी तरुणाच्या गुप्तांगावर वार करून खुन करण्यात येऊन गुन्हा लपविण्यासाठी त्याचे शव हतनूर कालवाच्या मुख्य पाटचारीत पाण्यात फेकून जनतेची व पोलिसांची दिशाभूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना दि.२ ऑक्टोबर रोजी अकुलखेडा (ता.चोपडा) येथे घडली होती. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

संशयाच्या सुईवरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पो. ना. प्रदीप राजपूत यांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या तीन दिवसातच अंबाडे (ता. चोपडा) येथून संशयित मारेकऱ्यास ताब्यात घेऊन शिताफीने अटक केली. पोलीस तपासात मारेकऱ्याने खुनाची कबुली दिल्याने पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश वेरसिंग पावरा (वय ३०, रा.पिसनाबल ता.सेधंवा जि.बडवाणी ह.मु.अकुलखेडा ता. चोपडा) व लहू आकाश भिल (वय २९, मूळ रा. अकुलखेडा ह.मु.अंबाडे ता.चोपडा) या दोघांची मैत्री असून दि. २ ऑक्टोबर रोजी अकुलखेडा येथे दोघांची भेट झाली त्यानंतर दोन्ही जण दिवसभर सोबत राहून दारू पीत असतांना दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी लहू आकाश भिल याने दिनेश वेरसिंग पावरा यास अकुलखेडा गावाच्या जवळ असलेल्या हतनूर कालवाच्या मुख्य पाटचारीवर नेऊन तेथे भांडणात दिनेश पावराच्या गुप्तांगावर वार करून त्याचा खून करून त्याचे शव पाटाच्या चारीत पाणीत फेकून गावकऱ्यांची व पोलिसांची दिशाभूल करून मारेकरी लहू आकाश भिल घटनास्थळावरून फरार झाला.

त्यानंतर हतनूर पाटाच्या चारीत पाण्यात अज्ञात इसमाचे शव गावकऱ्यांना आढळून आल्याने घटनेची पोलिसांनी खबर दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून गावकऱ्यांच्या मदतीने पाटाच्या चारीतून मृताचे शव बाहेर काढून त्याची ओळख पटविली असता दिनेश वेरसिंग पावरा रा.अकुलखेडा याचा असल्याची खात्री झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. पोलीस तपासात गावकऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि शवविच्छेदनात दिनेश पावराच्या गुप्तांगावर गंभीर वार केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनला दि.४ ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी साहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण व पो.ना. प्रदीप राजपूत यांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या तीन दिवसात फरार झालेल्या संशयित आरोपी लहू आकाश भिल यास अंबाडे (ता.चोपडा) येथून गुरुवारी दुपारी ताब्यात घेऊनअटक केली.

यावेळी आरोपीने दिनेश वेरसिंग पावरा रा. अकुलखेडा याचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी मयताचा भाऊ दिलीप वेरसिंग सस्ते (पावरा) याच्या फिर्यादवरून शहर पोलीस स्टेशनला भादवि कलम-३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.