धक्कादायक.. अत्याचारातून जन्मलेले बाळ टाकले नाल्यात

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा तालुकामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपडीत राहणा-या महिलेवर मद्याच्या नशेत अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. या अत्याचारातून तिने बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर घाबरलेल्या पिडित महिलेने ते बाळ नाल्यात टाकून दिल्याचा प्रकार चोपडा तालुक्यातील सनपुले या गावी घडला आहे.

या घटनेप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास गोकुळ पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. साधारण नऊ महिन्यापुर्वी कैलास पाटील या सनपुले येथील इसमाने आदिवासी समाजाच्या महिलेवर मद्याच्या नशेत अत्याचार केला. या अत्याचारातून तिला दिवस गेले. यातून तिने बाळाला जन्म दिल्याने समाजात बदनामी होवू नये म्हणून घाबरुन तिने आपल्या पोटच्या बाळाला नाल्यात फेकून दिले.

दरम्यान, चोपडा ग्रामीण पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले, पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नवजात बालकाला तातडीने चोपडा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पिडीत महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधम कैलास गोकुळ पाटील याला मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषिकेश हे करीत आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here