चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
चोपडा येथून धक्कादायक घटना समोर आलीय. तालुक्यातील एका गावात महिलेवर सुमारे वर्षभरापासून अत्याचार करत ती गर्भवती झाल्यानंतर तिची जबाबदारी न स्वीकारल्याने पीडित महिलेने आत्महत्या केली. दरम्यान तिच्या भावाने चोपडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून शिवदास रायसिंग पावरा (४७, ता. चोपडा) याच्याविरुद्ध बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवदास पावरा याने पीडित महिलेस आपल्या शेतात कामाला नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. त्यात महिला सात ते आठ महिन्यांची गर्भवती राहिली असता तिची जबाबदारी न घेता गाव सोडून निघून गेला. त्यामुळे पीडित महिलेने आत्महत्या केली. मयत महिलेच्या भावाने पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.