Sunday, November 27, 2022

भरधाव ट्रकच्या धडकेत मामा-भाची जागीच ठार

- Advertisement -

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे मामा-भाची जागीच ठार झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील रेलच्या मारुती मंदिराजवळ घडली. धक्कदायक बाब म्हणजे मयतांमध्ये सहा वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.

- Advertisement -

- Advertisement -

रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (क्र.एमएच 19 सीएच 5174) ला समोरून येणारा ट्रकने (क्र.एचआर 56 बी 4688)  आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. या अपघातात एक सहा वर्षीय विधी कोळी ही बालिका आणि  दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव)  हे जागीच ठार झाले आहेत.  तर एक महिला गंभीर जखमी झाली असून दीड वर्षीय चिमुकला मात्र सुखरूप आहे.

अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे वाहतूक काही वेळ खोळंबली होती. दरम्यान, शेवटची वृत्त हाती आले तेव्हा जखमी महिलेला जळगाव हलविण्यात आले होते. तसेच मयत हा आपल्या बहिणीला घेऊन विरवाडे ता. चोपडा येथून आपल्या घरी जात होता,असेही कळते.  घटनास्थळी सपोनि संतोष चव्हाण, पोहेकॉ प्रदीप राजपूत, पोहेकॉ जितेंद्र चव्हाण, पोकॉ प्रमोद पवार, पोना हेमत कोळी कर्मचारी जात पुढील कार्यवाही सुरु केली होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या