इंग्रजांनी आपली पारंपारीक बलस्थाने बारकाईने तोडली,पुन्हा भारतीय विचार आचारावा लागेल – डॅा.गजानन डांगे
इंग्रजांनी आपली पारंपारीक बलस्थाने बारकाईने तोडली,पुन्हा भारतीय विचार आचारावा लागेल – डॅा.गजानन डांगे
चोपडा -भारत वैभवक्षम असलेला देश मागे कसा पडला? इंग्रजांनी बारकाइने आपली पारंपारीक बलस्थाने तोडली. सरकाराधिष्ठीत व्यवस्था निर्माण केली.भारतीय जनता याचक राहिली पाहिजे अशी त्यामागची व्यवस्था होती..लाभधारक राहिले पाहिजे.
सगळं सरकाराने करावे ही मनस्थिती आपली झाली आहे.आपण सरकारची वाट बघतोय.त्यामुळे विकासाचं विकृत रुप भारतात तयार झाले आहे.विकासाच्या मॅाडेलची चिकित्सा झाली पाहिजे आहे.आपण विकास प्रक्रियेचे चिंतन केले पाहिजे.
वर्तमानातील विकास भारतिय नाही विदेशातील आहे.या विकासाचा हेतू मानवश्रीत आहेत.मुलभूत भारतीय विचाराचे इंजिन विकासाला जोडावे असे मत डॅा.गजानन डांगे (नंदुरबार) यांनी येथे व्यक्त केले. ते येथील नगर वाचन मंदिराच्या ५६ व्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफतांना ‘भारतातील विकास वर्तमान स्थिती, आव्हाने व आगामी दिशा’ या ‘ विषयावर ते बोलत होते.
यावेळी डॅा.डांगे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरची विकास यात्रा समजून घेण्याचा प्रयास करित राहिलो.सर्व पंचवार्षिक योजनांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला.बाराव्या पंचवार्षिक योजना सुरु गरिबी दुर करण्याचे ठरविले होते.त्यामुळे व्यापक गरिबी दुर होईल.गुंतागुतीची प्रक्रिया आहे.आरोग्य,शिक्षण व उपग्रहांच्या काळात जावून पोहचली.त्यात आनंद वाटावा असे चित्र आहे.भारत कृषीप्रधान व गावांचा देश आहे.तर गांव नेमकी कुठे आहेत?.गावात ग्रामस्थ आनंदाने राहतात का?गावातून स्थलांतर होत आहे.शेतीकडे बघतांना शेतीत शेतकरी आनंदी नाहित.शेतक-याला आपल्या पुढच्या पिढीने शेतीत राहू नये असे वाटते.पुढच्या पिढीने नोकरी करुन नित्य पैसा मिळावा अशी मनस्थिती आहे.स्वातंत्र्यानंतर देश पारतंत्र्यात जातो याची अनुभूती तेल ६० टक्के आयात करताना जाणवते.विकासाच्या मापदंडातून शेतितून उत्पन्न मिळाले पाहिजे.उत्पन्न मिळायला लागले.शेतीत नगदी पिकांचा प्रचार प्रसार सुरु केला.कापसाने पैसे मिळाले पण लोक आनंदी का नाहीत? खर्च वाढला,उत्पादन तेवढे येत नाही.पिक पध्दती बदलते अर्थव्यवस्था बदलायला लागते त्यात यांत्रिकीकरणाचा खर्च असल्याचे लक्षात आले.गावात राहवस वाटत नाही? शेती कराविशी वाटत नाही?सर्वच बिनसलयं आहे.नद्यांशी संवाद केला.रेती उत्खनन मोठ्या प्रमाणावर होत आहे. धरणांमुळे नद्यांचे असतित्व विचलित होत आहे.भक्तीभाव वाढला आहे पण दूषित पाणी नदीत सोडता आहेत.फॅशन जगात फास्ट फॅशनचे फॅड आले आहे.सुरत मध्ये चार करोड मीटर कपडे तयार होतात.विकासाचा क्रम भारतात प्रती व्यक्ती दुध कमी आहे.दुध वाढविले पाहिजे.म्हणून विदेशातून कुत्रीम रेतन केले.पण विदेशात आपल्या गिरिष गायींचे रेतन करुन अधिक दुध उत्पादीत केले जात आहे.आपल्याला झालयं तरी काय?सगळं पुरातन तंत्रज्ञान आपल्याकडे असतांना त्याकडे आपण दुर्लक्ष करित आहोत.
जी २० च्या अध्यक्षता भारत करीत असतांना सगळे जण भारताकडून उत्तर येईल अपेक्षा व्यक्त करित आहेत.जल,जंगल शाबूत ठेवण्यासाठी मुलभूत म्हणजे सृष्टि हा एकतत्वाचा विचार आहे.सृष्टीला बिघडविणे म्हणजे अधोगती आहे.स्त्रीसुक्त भारताचा अर्थव्यवस्थेचा विचार आहे.भारतीय संस्कृती ही कृतज्ञता आधारावर अवलंबून आहे.व्यक्ती केंद्रीततेच्या सवयी बदलण्याची गरज आहे.जगाला आगामी दिशा देण्याचा विचार भारतातूनच पुढे येईल त्याची सुरुवात अन्ना पासून सुरु होईल.त्यासाठी संगळ्यानी भारतीय रुढी परंपरा प्रमाणे जगण्याची सवय लावावी असे डॅा.डांगे म्हणाले.
याप्रसंगी वक्त्यांचे स्वागत अध्यक्ष आशिष गुजराथी यांनी केले.तर वक्ते डॅा.डांगे यांनी देणगीदार माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी यांचा सत्कार केला.परिचय अवधूत ढबू यांनी करुन दिला.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी केले.अवधूत ढबू यांच्या वंदे मातरमने व्याखानाचा समारोप झाला