मनोरंजनाचा विस्फोट टी.व्ही.मुळे सुरु झाला मोबाईलने कळस गाठला- संजय कळमकर
चोपडा प्रतिनिधि जगातील पहिला आनंदी देश फिनलंड आहे.भारत ११८ वा क्रमांक आहे.जनतेने आनंदी रहावे असे सरकारला देखील वाटत नाही.त्याचा उत्तम नमुना आधारकार्ड वरील फोटो आनंदी वाटतात का?कोणतीही निर्मिती होतांना त्यात ‘राम’ असावा लागतो.त्यामुळे राम कॅाग्रेसला समजले नाहीत.समाजात काही तरी रुप घेतल्याशिवाय कोणीही पाया पडत नाहीत.नाटक,रेडीओ यासारखी मनोरंजनाची साधने पुर्वी होते.अतिरेकी मनोरंजनाचा प्रारंभ टी.व्ही.मुळे झाला परंतु अलिकडे मोबाईलमुळे विस्फोट झाला आहे असे प्रतिपादन व्याख्याते संजय कळमकर (अहिल्यानगर) यांनी येथे केले.
कळमकर पुढे म्हणाले की,मोबाईलचा अतिरेक एवढा झालाय की कुणीही कशावरही अधिकारवाणीने व्यक्त होतो.मोबाईलमुळे माहितीचा धबधबा सध्या कोसळतो आहे. आभासी जगातून माणसं बाहेरच येत नाहीत.घर सुशिक्षीत आहेत.पण सुसंकृत असेलच असे नाही.आम्ही मार्कस वादी झालो आहोत.बहिणी लाडक्या आहेत.भाऊंचे भिखारी झाला आहे.पुर्वी शिक्षकांच्या हाती विद्यार्थ्यांचे भविष्य होते, आता विद्यार्थ्यांचे हातात शिक्षकांचे भवितव्य आहे.मुलगा ज्या क्षमतेचा आहे ते ओळखून त्याला द्या.आजूबाजूला आनंद आहे ते दिसलं पाहिजे.मनातल्या भावनांप्रमाणे सर्व दिसते.दुःख देखणे करायची सवय आहे.विषण्ण करणा-या गोष्टी आजूबाजूला घडत असतांना आनंद शोधायचा,सकारात्मक बाबी घेवून जीवन आनंदी करता येईल असेही ते म्हणाले.कळमकरांनी हलक्या फुलक्या नित्यांच्या सवयींवर विनोदपुर्ण भाषे करीत हसवीत ठेवले.
येथील नगर वाचन मंदिराच्या ५६ व्या व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफतांना वक्ते संजय कळमकर (अहिल्यानगर) या ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’ विषयावर बोलत होते.याप्रसंगी वक्त्यांचे स्वागत अध्यक्ष आशिष गुजराथी यांनी केले.तर वक्ते कळमकर यांनी देणगीदार माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी यांचा सत्कार केला.परिचय डॅा.परेश टिल्लू यांनी करुन दिला.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी केले.अवधूत ढबू यांच्या वंदे मातरमने व्याखानाचा समारोप झाला.
यावेळी श्रोत्यांमध्ये विशेष करुन माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी,विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॅा.विकास हरताळकर,चोपडे शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी मयूर,वाचनालयाचे पदाधिकारी,रसिक श्रोते हजर होते.