चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त आपल्या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी कष्ट करणाऱ्या कामगारांच्या हस्ते नगरपरीषद चोपडा येथे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सफाई कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण करून घेऊन एक अनोखा उपक्रम राबवून आदर्श निर्माण केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
१ मे हा महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन म्हणून जगभरात कामगारांच्या न्याय हक्कांचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. १ मे म्हणजेच मजदूर दिन हा दिवस कामगारांच्या कष्टांची आठवण करून देणारा आणि त्यांच्या हक्कांचा सन्मान करणारा दिवस आहे. जगभरात लाखो कामगार आपल्या परिश्रमातून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देतात. कारखाने, बांधकाम, शेती, वाहतूक, सेवा क्षेत्र अशा अनेक ठिकाणी ते झटत असतात. त्यांच्या श्रमाशिवाय कोणतेही राष्ट्र पुढे जाऊ शकत नाही.
आजही अनेक ठिकाणी कामगारांना योग्य वेतन, सुरक्षित कामाचे ठिकाण, आणि मानवी हक्क मिळालेले नाहीत. त्यामुळे या दिवशी केवळ साजरे करणे नव्हे तर कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचा निर्धार केला पाहिजे. असे प्रतिपादन मुख्याधिकारी राहूल पाटील चोपडा नगर परिषद यांनी केले असून काम करणाऱ्या प्रत्येक हाताला सन्मान मिळावा हेच १ मे च्या साजरीकरणाचे खरे प्रयोजन असल्याचे बोलून शहरातील नागरिकांचे मने जिंकली आहेत. तसेच या झेंड्याखाली आपण एक आहोत, आणि आपल्या देशाच्या भविष्यासाठी एकत्र काम करूया असा संदेश दिला.
सतत नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रत्येक कामगाराला न्याय देणारे समान व सन्मानाची वागणूक देणारे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी कमी कालावधीत नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचे मन जिंकले असून सर्वच त्यांच्या कार्याने खुश आहेत. यावेळी उपमुख्याधिकारी संजय मिसर, संदीप गायकवाड, मंगेश जंगले, (अभियंता) प्रणव पाटील, अक्षय चौधरी, मुकेश परदेशी, दीपाली साळुंखे (स्वछता निरीक्षक), जयेश भोंगे, जितेंद्र मोरे (पाणीपुरवठा अभियंता), व्ही. के. पाटील, चेतन अहिरराव, संजय धमाळ, महेश जोशी आणि कर्मचारी हजर होते.