Sunday, November 27, 2022

काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं? – चित्रा वाघ

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला आहे. नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत त्यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एका महिलेसोबत आहेत. पटोलेंचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी आता ट्रोलिंगला सुरुवात केली आहे. दरम्यान, यामागे भाजपाचे कटकारस्थान असल्याचे नाना पटोले म्हणाले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

नेटकऱ्यांनी नाना पटोले यांना आज ट्रोल केले आहे. मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. नानांच्या विरोधात टीकेची झोड उठलेली आहे. मात्र या दरम्यान, नाना पटोले यांना विचारपूस केली असता त्यांनी हे भाजपाचे कट कारस्थान असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी केला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या