रावेर येथे चितोडे वाणी समाज वधू वर परिचय मेळावा उत्साहात

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथे चितोडे वाणी समाजातील विवाह इच्छुक वधू वर यांचा परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . खान्देश, पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणचे जवळपास 120 इच्छुक वधू वर युवक युवती यांचा सहभाग या मेळाव्यात होता.

रावेर येथील माधवनाथ महाराज यांच्या मंदिर परिसरात या दिमाखदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी श्री अष्टविनायक  शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ जळगावचे अध्यक्ष सुनील वाणी होते तर प्रमुख पाहुणे चितोडे वाणी समाज मराठी या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि लोकशाही उद्योग समूहाचे संचालक राजेश यावलकर, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन डॉ. दत्त प्रसाद दलाल, रावेर शिक्षण संवर्धक संघ उपाध्यक्ष अशोक वाणी, संचालक शीतल वाणी, बालाजी महाराज संस्थनचे चेअरमन कैलास वाणी मप्र मधील राष्ट्रीय महिला कार्यकारणीच्या अध्यक्षा अंजली वाणी यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

चितोडॆ वाणी समाज रावेर येथील अध्यक्ष महेश अत्रे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दत्त प्रसाद दलाल यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की , आपले सामर्थ्य, कर्तृत्व, आणि अपेक्षा यांचा मेळ घालून वर आणि वधूचा शोध घ्यावा  असे सांगून लवकरच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन देखील व्हावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.

सर्व प्रमुख अतिथींचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रारंभी मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. आणि युवक युवती परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्रमुख अतिथी राजेश यावलकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आपल्याला अपेक्षित वर किंवा वधू मनाप्रमाणे मिळावा पण त्यात जास्त वेळ वाया घालवू नये. आपला जीवनसाथी हा सुयोग्य आणि कर्तृत्ववान मिळावा. केवळ नोकरदार किंवा मोठ्या शहरातीलच हवा असा हट्ट करू नये. परिवार माणुसकी जपणारा असावा हे प्रामुख्याने लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या मुलीलाच योग्य संस्कार द्यावेत. म्हणजे घटस्फोटासारख्या घटना घडणार नाही.

अंजली गडे यांनी सांगितले की, युवक युवती यांनी मनायोग्य साथीदार हा समाजातीलच शोधावा. प्रेम विवाहाच्या मायाजालमध्ये अडकू नये असाही  मौलिक सल्ला त्यांनी दिला.

शेवटी अध्यक्षीय भाषणात  सुनील वाणी यांनी सांगितले की, प्रेम विवाह करतांना आपण आपल्या आई वडील आणि सामाजिक स्थितीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. पत्रिका बघून विवाह न जुळविता माणसं पारखा असेही आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश पाटील यांनी केले पाहुण्यांचा परिचय किरण वाणी यांनी करवून दिला आभार गिरीश पाटील यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी चितोडे वाणी  समाजाचे पदाधिकारी निलेश पाटील, उदयकांत वाणी, प्रमोद गजेश्वर, प्रशांत श्रावक, सुनील वाणी, अमोल पाटील, दिलीप वाणी, वैभव कौशिक, सुनील वाणी, प्रशांत वाणी, गिरीधर गजेश्वर यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.