आदिशक्ती कालिका पद्मावती मातेचा वार्षिक महोत्सव उत्साहात
चितोडे वाणी भाषा दिन साजरा : समाजबांधवांची होती उपस्थिती
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
फाल्गुन शुद्ध द्वितीया दि. 1 मार्च रोजी चितोडे वाणी समाज भुसावळच्या कालिका पद्मावती मंदिरात येथे कालिका पद्मावती मातेचा पंधरावा वार्षिक महोत्सव आणि जागतिक चितोडे वाणी भाषा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रारंभी सकाळी मातेच्या मिरवणुकीसाठी घोड्यावर बसण्याची मानाची बोली बोलण्यात आली. या बोलीमध्ये पराग चितोडकर यांनी सर्वात जास्त रुपये पंधराशे देणगी देऊन घोड्यावर बसण्याचा मान पटकावला. फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये कालिका पद्मावती मातेची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात सुवासिनींच्या हस्ते कालिका पद्मावती मातेच्या मूर्तीस औक्षण करण्यात आले.
मंदिरावर ध्वज लावण्याची बोली बोलण्यात आली. पराग चितोडकर यांच्या मातोश्री श्रीमती मंगला चितोडकर यांच्या हस्ते मातेच्या मंदिरावर विधीवत ध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहणानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जागतिक चितोडे वाणी भाषा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आपुनकी वाणी भाषा या व्हाट्सअप समूहाचे प्रशासक अविनाश श्रावगी यांच्या हस्ते जागतिक चितोडे वाणी भाषा दिन फलकाचे अनावरण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अविनाश श्रावगी यांनी वाणी भाषेचे महत्व काय ती का बोलावी तिला पुनर्जीवित करण्याचे काय फायदे आहे याबद्दल सविस्तर माहिती वाणी भाषेतूनच दिली. रूपाली महेंद्र सराफ (नशिराबाद) यांनी ही कल्पना त्यांना का सुचली याबद्दल माहिती करून दिली. आपुन की चितोडे वाणी भाषा या व्हाट्सअप ग्रुप वरील भुसावल येथील सक्रिय सभासद सीमा राजेंद्र अकोले यांनीही मनोगत व्यक्त केले.
भुसावल येथून साक्षी महेश वाणी या नवयुतीने वाणी भाषेमध्ये एक सुंदर संदेश दिला. सरकार दरबारी चितोडे वाणी भाषेची दखल घेतली गेल्याची आणि सरकारी दरबारी वाणी भाषेत काय महत्त्व आहे याबद्दल जळगाव चिवासचे अध्यक्ष प्राध्यापक उमेश वाणी यांनी विस्तृत माहिती दिली. भुसावल येथील मधुकर भागवत वाणी यांनी सुद्धा आपल्या वाणी भाषेतून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन चितोडे वाणी समाज उपाध्यक्ष राजेंद्र यावलकर यांनी वाणी भाषा शिकणारा मी नवीन विद्यार्थी असल्याने यावेळेस मी मराठीतूनच सूत्रसंचालन करत आहे परंतु पुढच्या कार्यक्रमात हे संपूर्ण सूत्रसंचालन आपल्या वाणी भाषेतच करेल असे आश्वासन दिले.
पुणे येथुन सुरेश अकोले यांनी या कार्यक्रमास पाठवलेला वाणी भाषेतील शुभेच्छा संदेश वाचून दाखवला. लोकशाही माध्यम समूहाचे राजेश यावलकर यांनी वाणी भाषा शिकण्यासाठी काही नवीन सूचना सभागृहात दिली. त्यांच्या सूचनेस अविनाश श्रावगी यांनी अनुमोदन दिले. माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी या सभागृहाच्या विकासासाठी तन मन धनाची मदत करण्याचे आश्वासन दिले. अध्यक्ष प्रमोद बडछापे यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर सर्व उपस्थित समाज बांधव आणि मान्यवरांच्या हस्ते मातेची महाआरती करण्यात आली. कालीका पद्मावती मातेच्या उत्सवाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चितोडे वाणी समाज सचिव गणेश रामचंद्र वाणी यांनी केले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट गिरीश वाणी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे ,समाजसेवक सतीश सपकाळे, डॉ.डी.एन. वाणी, समाजाचे अध्यक्ष प्रमोद बडछापे, उपाध्यक्ष राजेंद्र यावलकर, दैनिक लोकशाही माध्यम समूहाचे संचालक राजेश यावलकर, ॲड.योगेश वाणी, अनंत गडे, अशोक वाणी, सुनिल वाणी, प्रा.उमेश वाणी, धनंजय वाणी, अविनाश श्रावगी रुपालर सराफ यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतुल श्रीराम वाणी, महेश शांताराम वाणी, गिरीश गजेश्वर, दत्तात्रय एकनाथ वाणी, संजय नारायण वाणी, कपिल अशोक सराफ, देवेश गोपाळ वाणी, शुभम नरेंद्र अकोले, अभय विनायक दाते, अनिल सुधाकर वाणी, अनंत अरविंद वाटपाडे, रत्नाकर राजाराम वाणी, समाज मंदिराचे व्यवस्थापक मुरलीधर डोंगरदास वाणी यांनी परिश्रम घेतले.