चितोडे वाणी भाषा पोहचली सातासमुद्रापार!

सुरेश अकोले यांचा सन्मान : माधुरी पाराशर यांच्या प्रयत्नांना यश : कवितेचा चितोडे वाणी भाषेत अनुवाद ठरला मानबिंदू

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नशिराबाद येथील मूळ रहिवासी सध्या पुणे पिंपळे सौदागर येथे वास्तव्यास असलेले सुरेश रामदास अकोले यांना वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया संस्थेतर्फे मुंबई येथे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कामगिरीमुळे चितोडे वाणी समाजाचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. डोंबिवली येथील कवी, साहित्यिक, गझलकार विजय जोशी यांच्या ‘बाया’ या कवितेचा चितोडे वाणी भाषेत अनुवाद करून पाठविण्यात आला होता.

या कवितेचा 56 भाषेत अनुवाद झाला आहे. भारतीय भाषेसह परदेशी भाषांचाही समावेश आहे. या 56 भाषेत चितोडे वाणी भाषा ही समाविष्ट आहे. हा जागतिक पारितोषिक वितरण सोहळा डोंबिवली (पूर्व) येथे गणेश मंदिर संस्थांनाच्या विनायक सभागृहात झाला. यावेळी कवी संमेलनही झाले. त्यात मंजूषा बुरुजवाले (डोंबिवली) यांच्या ‘झालं गेलं विसरून जा’ या कवितेने रसिकांची मने जिंकली. विजय जोशी यांनी प्रास्तविक केले.

चितोडे वाणी भाषा सातासमुद्रापार पोहचली असून सुरेश अकोले यांनी कवितेचे अनुवादन केले आहे. चितोडे वाणी भाषेची शासन दरबारी दखल घ्यावी यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील माधुरी पाराशर यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्रातील मराठी व्यतिरिक्त एकूण 57 बोली भाषांचे संकलन सांस्कृतिक मंत्रालयाकडून करण्यात आले. त्यात चितोडे वाणी भाषेचा समावेश आहे. चितोडे वाणी भाषा 54 क्रमांकावर संग्रहीत झाली आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील माधुरी पाराशर यांनी विशेष प्रयत्न केले. सुरेश अकोले यांनी अनुवादीत केलेल्या कवितेमुळे चितोडे वाणी भाषा सातासमुद्रापार पोहचली आहे. यानिमित्त दि. 15 जून रोजी वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये सन्मानित करण्यात आले. 56 अनुवादीत भाषेत 34 बोली भाषा, 15 प्रादेशिक भाषा, 7 जागतिक भाषा आहेत. ब्रह्मी आणि मोडी लिपीचाही यात समावेश आहे. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी चीफ एडीटर सुषमा नार्वेकर व मार्केटींग हेड संजय नार्वेकर यांच्या हस्ते श्री. अकोले यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

सातासमुद्रापार डंका

चितोडे वाणी भाषेचा प्रवास सातासमुद्रापार झाला असून त्याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने देखील घेतली आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने देखील दखल घेवून भाषेची नोंद केली आहे. यामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे. चितोडे वाणी भाषेचा डंका सातासमुद्रापार पोहचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.