Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकशाही विशेष»चायनिज पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच!
    लोकशाही विशेष

    चायनिज पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 28, 2026No Comments171 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही विशेष लेख

    भारतीयांना चायनीज गोष्टीचे पूर्वीपासूनच आकर्षण आहे. अगदी चिनी वस्तूंपासून चायनिज पदार्थांपर्यंत सर्वच गोष्टी भारतीयांना आवडतात. त्यातही चायनिज पदार्थांची तर सर्वांना चटक लागलेली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले तर बरेच जण चायनिज पदार्थांचाच बेत करतात. मात्र भारतात आणि चीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थात खूप फरक आहे.

    भारतात चायनिज पदार्थांच्या नावाखाली जिभेला पूरक ठरतील असे चवीचे पदार्थ तयार केले जातात. रस्त्याशेजारी, फुटपाथवर, गल्लीबोळात स्वस्त आणि सहज मिळणारे गडावरील चायनिज पदार्थ खाण्याकडे सर्वांचा कल असते त्यातही या गाड्यांवर तरुणाईच अधिक दिसते. चायनिज गाड्यांवर तरुणाईची झुंबड उडाल्याचे दिसते. ग्रुपमधील कोणा मित्राचा वाढदिवस असेल तर तो साजरा करण्यासाठी तरुणाई चायनिज गाड्यावरच जातात.

    हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या तुलनेत येथे स्वस्तात पदार्थ मिळतात हे त्या मागचे मुख्य कारण आहे. मात्र हे पदार्थ स्वस्तात देण्यासाठी तेथील आचारयाना अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्यात निकृष्ट प्रकारच्या पदार्थांच्या भाज्या आणि तेल वापरले जाते. चायनिज पदार्थांमध्ये अजिनिमोटो हा पदार्थ वापरला जातो. पदार्थांना चव आणण्यासाठी या पदार्थांचा वापर केला जातो. आवश्यकतेपेक्षा जास्त अजिनिमोटो हा पदार्थ वापरला गेला तर त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होऊ शकतो. चायनिज पदार्थांमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यासारखे जिन्नस वापरल्यामुळे पचन संस्था बिघडू शकते.

    भात बांबूचे मूळ, मशरूम, नूडल्स, चिकन, मांस अर्धवट शिजवले जातात त्यामुळे ते पचायला जड जातात चांगल्या प्रतीचा मैदा नसल्यास तो आतड्यास चिकटू शकतो. चायनिज पदार्थांमध्ये वापरला जाणारा तांदूळही पॉलिश आणि रिफाईंड असल्याने पचन संस्थेसाठी हितकारक नसतो. त्यामुळे चायनिज पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारकच आहे. एखाद्यावेळी चायनिज पदार्थ खाल्ल्याने ते ही चांगल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जाऊन तर बिघडत नाही. पण आठवड्यातून चार पाच वेळा चायनिज पदार्थ खाण्याची सवय हानिकारक ठरू शकते.

    श्याम ठाणेदार
    दौंड जिल्हा पुणे
    ९९२२५४६२९५

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा

    September 9, 2026

    बापरे! हायकोर्टाकडून अन्न व औषध प्रशासनाची कानउघडणी

    September 8, 2026

    डिजिटल क्रांती : समृद्ध शेतीचा पाया/ ‘स्मार्ट शेती, भरघोस प्रगती’

    September 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif