Sunday, May 29, 2022

भोरसा भोरशी ग्रामसेवा सहकारी संस्थेवर प्रशांत ढोरे पाटील यांची अध्यक्षपदी अविरोध निवड

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

चिखली; तालुक्यातील भोरसा भोरशी ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या  संचालकांची अविरोध निवडणूक पार पडल्यानंतर  नवनियुक्त संचालकांच्या मधुन अध्यक्ष व  उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी चिखली येथील संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या बोलावलेल्या सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक घेण्यात आली यामध्ये भगवान मुरलीधर ढोरे हे अध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार होते .

- Advertisement -

परंतु त्यांना सुचक, अनुमोदन न मिळाल्याने त्यांना निवडणुकीतुन माघार घ्यावी लागली व त्यांचे देखील मत प्रशांत पाटील यांच्या बाजूला पडल्याने सर्वानुमते अध्यक्षपदी प्रशांत पुरुषोत्तम ढोरे पाटील तर उपाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय वडतकर यांचे साले दगडू रामचंद्र आकाळ यांची अविरोध निवड करण्यात आली,प्रशांत पाटील हे मागील १५ वर्षांपासून शेतकरी चळवळीत कार्य करीत असून  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या कधी संवादाच्या तर कधी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी सोडवल्या आहेत,

प्रशांत पाटील हे माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे अत्यन्त निकटवर्तीय कार्यकर्ते असून ते रयत क्रांती संघटनेद्व्यारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असतात,शेतकरी चळवळीचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरासह राज्यात देखील ओळख आहे,प्रशांत पाटील यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे,आपल्या पदाला न्याय देण्याची भूमिका व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कायमच कटिबद्ध राहू असा विश्वास निवडीनंतर प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला.

या निवडीनंतर संचालक मंडळाकडुन पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचा सत्कार  करण्यात आला,यावेळी काँग्रेसचे माजी ता.अध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सतेंद्र भुसारी,भाजपाचे मा. ता. उपाध्यक्ष  गजानन पाटील,प्रताप पाटील,भाजपा तालुका उपाध्यक्ष अनमोल ढोरे पाटील, भाजपा सरचिटणीस रमेश आकाळ,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शरद ढोरे पाटील,ग्रा पं सदस्य विष्णू मुरकुटे,काँग्रेसचे नेते तुळशीदास आकाळ,ग्रा पं सदस्य योगेश ढोरे पाटील,पंढरी गोंधळे,सरपंच विकास गवई,शेख बाबू,मा.उपसरपंच सत्तार भाई,संजय भुसारी ,काँगेस ता.उपाध्यक्ष समाधान आकाळ,ग्रा पं सदस्य राजेश गवई,तंटामुक्ती अध्यक्ष संदीप ढोरे पाटील,शेतकरी संघटनेचे ता.उपाध्यक्ष गोपाल ढोरे पाटील,

उपसरपंच शेख अल्ताफ,ग्रा.से.स.सोसायटी मा. अध्यक्ष बद्री भुसारी,काँग्रेस नेते कृष्णा मुरकुटे,शिवशांत ढोरे,सचिन ढोरे,सौरभ ढोरे,दत्ता आष्टीकर,मनोज आकाळ यांच्यासह भोरसा भोरशी ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक भाजपा ता. उपाध्यक्ष गजानन पाटील,निवृत्ती भुसारी,संगीता सतेंद्र भुसारी,काँग्रेस सेवादल ता. अध्यक्ष रामेश्वर भुसारी, संगीता संतोष आकाळ,दगडूबा आकाळ, साहेबराव भुसारी , आकाळ,पांडुरंग मुरकुटे,शेख समद भाई,अर्जुन गवई सह ग्रामस्थ उपस्थित होते, निवडणूक अधिकारी म्हणून पवार साहेब व आंभोरे साहेब यांनी काम बघितले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या