Wednesday, May 25, 2022

हृदयद्रावक घटना.. २ रुपयांच्या ‘पेप्सी’ ने घेतला ७ मुलांचा जीव !

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राजस्थानमधील सरूपगंजजवळील फुलाबाई खेडा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ७ बालकांचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. बालकांच्या मृत्यूचे कारण शोधण्यात फुलाबाई खेडा येथील ब्लॉक, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय वैद्यकीय पथके गुंतलेली आहेत.

- Advertisement -

गुरुवारी सकाळी आणखी दोन मुलांची प्रकृती खालावली, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळच्या सुमारास प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये विकले जाणारे शीतपेय (पेप्सी) खाल्ल्याने प्रकृती खालावल्याचे मुलांच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

याप्रसंगी डॉ. रामसिंग यादव म्हणाले की, अहवालाच्या आधारे असे मानले जाऊ शकते की, पाण्यापासून बनलेल्या पदार्थांमध्ये आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स आणि इतर द्रवपदार्थ यांना प्रथमतः मृत्यूचे कारण मानले जात आहे. वैद्यकीय विभागाने गावातील अर्धा डझनहून अधिक लहान-मोठ्या दुकानांतून या पेप्सीचे नमुने घेतले असून इतर कोणत्याही बालकाला याचा फटका बसू नये म्हणून त्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.

बुधवारी एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वैद्यकीय विभाग आणि पिंडवाडा उपविभागीय अधिकारी हसमुख कुमार यांनी संपूर्ण गावात घरोघरी जाऊन पाहणी करून आजारी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

फुलाबाई खेड्यात पसरलेल्या या आजाराने ७ बालकांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. वैद्यकीय पथक गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहे. एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाल्याने जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सकाळपासूनच वैद्यकीय, प्रशासन व इतर पथके पीडित कुटुंबाकडून माहिती गोळा करत आहेत. गुरुवारी सकाळी अचानक दोन मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना सरपंच विपेश गरसिया यांनी रुग्णालयात नेले. एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान पीडित कुटुंबातील सदस्य ताराराम जानवा यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील तीन मुलांचा एकत्र मृत्यू झाला. तिन्ही मुलांना तणाव, जखडणे आणि रक्ताच्या उलट्या झाल्या. मृत्यूच्या कारणाबाबत त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या